विजयादशमी निमित्त साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विजयादशमी निमित्त साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी,  ( प्रबोधन न्यूज )  -  मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे - आळंदी रोड, वडमुख वाडी येथील साई मंदिरामध्ये गुरुवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिर, वडमुखवाडी, आळंदी रोड पुणेचे विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी  प्रसिद्धीस दिली आहे.
     विजयादशमीच्या निमित्त मंगळवारी (दि.२४) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, पारायण सांगता सोहळा, रुद्राभिषेक, भिक्षा झोळी, भजन कार्यक्रम यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती होणार आहे. आरती नंतर महाप्रसाद, श्रीं चे नामस्मरण श्रीं ची प्रार्थना व दीपज्योत, नंतर ४:३० वाजता सिमोल्लंघन व मिरवणूक, श्रीं ची पालखी,  धुपारती, निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम व श्री हरिजागर रात्री दहा वाजता असे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी मुख्य दिवशी देवस्थान रात्रभर दर्शनाकरिता खुले राहील. 
      बुधवारी (दि.२५) पहाटे ५:४५ वाजता मंगल स्नान, ७ वाजता साईबाबांची आरती, दुपारी १२ वाजता माध्यान आरती, सायंकाळी ७ वा. धुपारती, रात्री ११ वा. श्रींची शेजारती. उत्सवाची सांगता गुरुवारी (दि.२६) होईल. यामध्ये
पहाटे ५:१५ वा. श्रींची काकड आरती, सनई वादन, ७ वा. श्रींची आरती, सकाळी ११ वा. गोपाळकाला, दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, संध्याकाळी ७ वा. धुपारती, संध्याकाळी ७:३० ला निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम नंतर पालखी, रात्री १० वा. श्रींची शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त सुभाष नेलगे यांनी केले आहे.