खराळवाडीतील मुलीचा संशयास्पद मृत्यू; तिच्या प्रियकराची आत्महत्या
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी – येरवड्यात संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणलेला पाहताच भावनाविवश झालेल्या तिच्या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची हृदयद्रावक घटना खराळवाडी, पिंपरी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, एका निष्पाप जिवाच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खराळवाडीतील एका अल्पवयीन मुलीचा पुण्यातील येरवड्यात संशयास्पद मृत्यू झाला. तिचे पार्थिव आज दुपारी ४ वाजता खराळवाडीतील तिच्या घरी आणण्यात आला. त्या वेळी जयेश रामदास मंगळवेढेकर (वय २०, राहणार खराळवाडी, पिंपरी) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवेढेकर याचे या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. अशातच त्या मुलीचा येरवड्यातील एका इमारतीच्या जवळ दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. तेव्हापासून जयेश अस्वस्थ होता. याच नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केली असावी असे तेथील नागरिकांनी सांगितले.
नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह अंत्यविधीसाठी घरी आणला. तेथे थोडा वेळ थांबून लिंक रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, जयेशला हा धक्का सहन न झाल्यामुळे त्याने प्रथम दोन्ही हाताच्या नसा कापल्या, तरीही जीव जात नाही हे पाहून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.