शीतल म्हात्रे प्रकरण – आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय व युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शीतल म्हात्रे प्रकरण – आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गे याला ताब्यात घेतलं आहे. साईनाथ दुर्गे हा आदित्या ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसंच तो सघ्या युवासेना कार्यकारिणीची सदस्य आहे. मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन साईनात दुर्गेला ताब्यात घेतलं आहे.

मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी श्रीकृष्ण नगर या ठिकाणी नदीवरील पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे हे देखील होते. त्यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ठाकरे गटाने चुकीच्या पद्धतीने तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर संतापलेल्या शीतल म्हात्रे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

राजकारणात महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले, तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?", असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला आहे.

विधानसभेतही मुद्दा उपस्थित

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल क्लिपचा मुद्दा आज विधानसभेतही गाजला. एका महिलेला मॉर्फिंग क्लिपवर किती खुलासे करावे लागणार असा सवाल शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी विचारला. तर संध्याकाळपर्यंत ही मॉर्फिंग क्लिप सोशल मीडियात फिरवणारा मास्टरमाईंड शोधून काढा अशी मागणी भाजप आमदार मनिषा चौधरींनी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.

दरम्यान, शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर दहिसर पोलिसांनी धरपकड सुरू केली. दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला दोन जणांना ताब्यात घेतलं. मानस कुवर (वय 26) आणि अशोक मिश्रा (वय 45) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.

रविवारीच एकाला शिवसैनिकांनी मारहाण करुन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा इसम काँग्रेसशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं. या तिघांचीही चौकशी सुरू असताना पोलिसांनी कल्याणमधून आणखी एकाला ताब्यात घेतलं.

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून एका तरुणाला ताब्यात घेतलं. कल्याणमधील तिसगाव परिसरातून या तरुणाला ताब्यात घेतलं असून, विनायक डायरे असं या तरुणाचं नाव आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबीयांनी केला आहे. नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याबाहेर रात्री ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.