नऊ वर्षांच्या जसराज सिंहने गणितात केला विक्रम, 2 मिनिटांत सोडवले 100 प्रश्न
वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी रायपूरचा जसराज सिंह हा सर्वात जलद गुणाकारासाठी वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
रायपूर (छत्तीसगड) - रायपूरमधील जसराज सिंह या तरुण विद्यार्थ्याने अनोखा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 2 मिनिटांत 100 गुणाकार सोडवले आहेत. असे करणारा जसराज हा देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या सोबतच वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून त्यांनी राज्य आणि देशातही नावलौकिक मिळवला आहे. मास्टर जसराज हा साडेनऊ वर्षांचा असून इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे.
जसराज सिंह रायपूरच्या पंढरी भागात राहतो. त्याने सर्वात जलद गुणाकारात प्रभुत्व मिळवले आहे. तो म्हणाला की, 'मला या सर्व गोष्टींमध्ये सुरुवातीपासूनच खूप रस होता. त्यामुळेच मी या गोष्टी करायला सुरुवात केली. मी रोज सराव करायचो. आता एक राष्ट्रीय स्पर्धा होती. त्यात मी उत्तर पाहून फक्त टाईप करत होतो. तेव्हाच मला वाटले की मी हा रेकॉर्ड बनवू शकतो. मी गेली ४ वर्षे हे करत आहे.' तो म्हणाला की, त्याचे स्वप्न सैन्यात भरती होण्याचे आहे. त्याला तिथे जाऊन देशसेवा करायची आहे.
जसराजचे वडील सांगतात की, 'जसराजची आवड लहानपणापासूनच खूप वेगळी होती. तो बहुआयामी मुलांमध्ये येतो, जे एकावेळी अनेक गोष्टी करू शकतात. आम्हाला त्याची क्षमता लहानपणीच समजली होती. जसराज नक्कीच काहीतरी करेल, असे आम्हाला माहित होते.' ते म्हणाले की, 'मी जसराजला एका सामान्य मुलाप्रमाणेच तयार करतो. बाकीची क्षमता त्याच्यात आहे. तो आपोआप त्यात वाढ करत राहील'.
जसराजची आई म्हणते की, 'जसराजला सैन्यात जायचे असेल तर त्याचे स्वागत आहे. मुलांनी त्यांना हवे ते केले पाहिजे आणि प्रत्येकाने मुलांना हवे ते करू दिले पाहिजे. तो लहान असताना मी त्याची प्रतिभा लगेच ओळखली. लहानपणी भगतसिंगांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी मी त्याला तयार करत होते तेव्हा शिक्षकांनी त्याला केवळ ड्रेस घालून पाठवायला सांगितले, पण मला वाटले की त्याने नाराही द्यावा. मी जसराजला नारा सांगितला आणि अडीच वर्षांच्या या मुलाने तो जशास तसा पाठ केला. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे. त्यात तो अपलोड करत राहतो. एवढेच नाही तर रतन टाटा यांच्यावर त्याने हिंदीत मोठे भाषणही केले आहे. जसराज याला केवळ गणितातच नाही तर प्रत्येक गोष्टीत रस आहे.'