भारतीयांचे कसे असते सेक्स लाईफ ? सरकारी अहवालातून मिळाली धक्कादायक माहिती

भारतीयांचे कसे असते सेक्स लाईफ ? सरकारी अहवालातून मिळाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली, दि. 20 मे - एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. आजही भारतात लोकं सेक्सबद्दल बोलणं टाळतात. मात्र सेक्ससंदर्भात वाटणारी लाज आणि संकोच लोकांना धोकादायक आजारंही देऊ शकतात. नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्वेक्षणात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये प्रथम लैंगिक संबंध ठेवण्याचं वय, सेक्सुअल पार्टनर्सची संख्या आणि लैंगिक संबंधासाठी पैसे देण्याबाबत गोष्टींचा समावेश होता.

नॅशनल फॅमिली हेल्थच्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर, लग्न झालेला जोडीदार किंवा घरात राहणाऱ्या जोडीदाराशिवाय इतरांशी शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

दरम्यान सरकारच्या या अहवालातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असल्याचं दिसून आलं. लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला.

घरातून बाहेर पडल्यावर पुरुषांच्या तुलनेत महिलांचं लैगिंक संबंधांचं प्रमाण वाढलं आहे. जेव्हा महिला एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक वेळ घरारासून दूर असतात, तेव्हा सेक्सुअल पार्टनर्सची संख्या 1.7 च्या सरासरीच्या तुलनेत 2.3 पर्यंत वाढल्याचं दिसून आलं. तर पुरुषांसाठी ही सरासरी 2.1 राहते.

या सर्व्हेक्षणाअंतर्गत, 56 टक्के महिलांनी सांगितलं की, घरातून दूर गेल्यावर त्या लैंगिक संबंध ठेवतात. तर घरापासून दूर राहिल्यानंतर केवळ 32 टक्के पुरुष शारीरिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं.

या सर्व्हेमध्ये 15-49 वयोगटातील महिला आणि पुरुषांना गेल्या 12 महिन्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 1 टक्क्यांहून कमी महिलांनी (0.3 टक्के) आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे मान्य केलं.

एका टक्क्यापेक्षा कमी महिला (0.5 टक्के) आणि 4 टक्के पुरुषांनी सांगितलं की, त्यांचे जोडीदार किंवा घरात राहणार्‍या व्यक्तीशिवाय त्यांचे इतर कोणाशीही शारीरिक संबंध आहेत.

७.४ टक्‍के पुरुष आणि दीड टक्‍के महिलांनी मान्य केले की त्यांनी लग्नाआधी सेक्स केला आहे. श्रीमंत पुरुष आणि महिला लग्नाआधी सेक्स करण्यात सर्वांत पुढे आहेत, हेही सर्वेक्षणातून समोर आले. भारतात सेक्‍सचे वय १८ वर्षे आहे. मात्र ६ टक्‍के महिलांनी मान्य केले की त्यांनी त्यापेक्षा कमी वयात सेक्‍स केला. मुलांच्या बाबतीत हे प्रमाण ४.३ टक्‍के आहे. सर्व्हेत २५ ते ४९ वयोगटातील महिलांना विचारले गेले की त्यांनी कोणत्या वयात सेक्‍स केला होता. त्यावर १०.३ टक्‍के महिलांनी वयाच्या १५ व्या वर्षात सेक्स केल्याचे सांगितले.

पुरुषांचे हे प्रमाण ०.८ टक्‍के होते. ८७ टक्‍के महिला आणि ८३ टक्‍के पुरुषांचे म्हणणे आहे, की पत्नी सेक्ससाठी नकार देऊ शकते. राज्‍यानुसार या मतात बदल दिसून येतो. शिकलेले आणि श्रीमंत लोकांचे जास्त पार्टनर असण्याची शक्यता असते. अशिक्षित महिलांचे प्रमाण यात केवळ ०.३ टक्‍के आहे, तर पुरुषांचे प्रमाण २.२ टक्‍के.

१२ वीपर्यंत शिकलेल्या महिलांचे प्रमाण यात ०.८ टक्‍के आहे तर पुरुषांचे प्रमाण ५.६ टक्‍के. मध्यमवर्गीय महिलांपैकी ०.५ टक्‍के महिलांनी कबूल केले की त्यांनी दुसऱ्यासोबत सेक्स केला. पुरुषांचे हे प्रमाण ३.४ टक्‍के राहिले. श्रीमंत महिलांपैकी ०.६ टक्‍के महिलांनी सांगितले की गेल्या वर्षी त्यांनी दुसऱ्या व्यक्‍तीसोबत संबंध ठेवले तर पुरुषांचे हे प्रमाण ४.८ टक्‍के आहे.