होळीच्या दिवशी शेतकऱ्याने केली कांद्याची होळी, होळीसाठी मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांद्याची होळी करणार असल्याची पत्रिका काढून सोशल मीडियावर व्हायरल केली होती.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
येवला - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांदा दराच्या प्रश्नाने राजकारण तापले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांदा विकल्यानंतर केवळ २ रुपयांचा चेक मिळाल्याचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. त्याचबरोबर नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याची घोषणी राज्य सरकारने केली होती.
मात्र त्यानंतरही कांदा दरातील घसरण कायम असून शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाचा खर्च तर दूर मात्र वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी कांदा फुटक वाटत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक एका शेतकऱ्यावर होळीदिवशीच कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतातील कांदा पीक जाळून टाकले. कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.
कृष्णा डोंगरे असे कांदा पिकाची होळी केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सरकारने नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केली असली कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही.यामुळे कांदा दरांतील घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे. कृष्णा डोंगरे यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला आग लावून होळी साजरी करत सरकारीचा निषेध व्यक्त केला.
राज्यातील कांद्याच्या दराने निचांक गाठला आहे. त्यामुळे कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याची होळी करून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांद्याची होळी करणार असल्याची पत्रिका काढून सोशल मीडियावर व्हायरल केली होती.
या कांदा अग्निडाग समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. पत्रिकेत दिलेल्या वेळेप्रमाणे या शेतकऱ्याने आज होळीच्या दिवशी सकाळी अकरा वाजता तब्बल दीड एकरावरील कांद्याला आग लावली.