संतपीठ मधील बालचमुंनी लुटला खरेदी-विक्रीचा आनंद

नर्सरी, जुनिअर के.जी मधील विद्यार्थ्यांनी फळे, भाजी, धान्य, कडधान्य, शालेय उपयोगी वस्तू, इ. ची माहिती सांगून प्रदर्शन मांडले होते.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संतपीठ मधील बालचमुंनी लुटला खरेदी-विक्रीचा आनंद

चिखली - पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अॅन्ड जुनिअर कॉलेज, टाळगाव चिखलीतील नर्सरी, जुनिअर के.जी. तसेच सिनिअर के.जी. मधील विद्यार्थांमार्फत ‘संतपीठ स्मार्ट बाझार‘ चे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचे उद्घाटन उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले. नर्सरी, जुनिअर के.जी मधील विद्यार्थ्यांनी फळे, भाजी, धान्य, कडधान्य, शालेय उपयोगी वस्तू, इ. ची माहिती सांगून प्रदर्शन मांडले होते. तसेच सिनिअर के.जी. मधील विद्यार्थ्यांनी याच वस्तूंची खरेदी-विक्री करून उपक्रमाचा आनंद लुटला. सिनिअर के.जी. मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘घातला दुकान’ हा  संत तुकाराम महाराजांचा अभंग लक्षवेधी ठरला.

सदर कार्यकमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. प्रदीप जांभळे पाटील, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे शिक्षण अधिकारी तथा संतपीठ संचालक मा. संजय नाईकडे, संतपीठ - संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे व डॉ. स्वाती मुळे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता काळे साहेब, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मध्यवर्ती भांडार विभागाचे संतोष थोरात साहेब, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विद्युत विभागाचे दळवी साहेब व गलबले साहेब, आर्किटेक्ट मिलिंद कीरदत्ता, तसेच विद्यार्थी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमा दरम्यान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांकडून खरेदीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य, विक्री कौशल्य, व्यावहारिक ज्ञान तसेच पैशांची देवाण-घेवाण विकसित व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना, संतपीठच्या प्राचार्या डॉ.मृदुला महाजन यांचे, व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.