रहाटणी पिंपळे सौदागर येथील आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करा - नाना काटे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रहाटणी पिंपळे सौदागर येथील आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करा - नाना काटे

 पिंपळे सौदागर , (प्रबोधन न्यूज )  -  प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील आरक्षण क्र. ३६१  मधील गार्डनचे आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करण्यात यावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या कडे केली आहे.  

 

      दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील सर्वे न. २१ मध्ये आरक्षण क्र. ३६१ नुसार  गार्डनचे आरक्षण आहे, ते बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल विकसित करण्यात यावा, मा. आयुक्त महोदय प्रभागातील सद्य परीस्थीती पाहता पिंपळे सौदागर या प्रभागात महानगरपालिकेच्या वतीने सर्व सोयीसुविधा युक्त अशे ३ गार्डन व २ प्ले ग्राउंड  विकसित करण्यात आहेत, नागरिक देखील त्याचा मनसोक्त पद्धतीने आनंद घेतात, तसेच पिंपळे सौदागर परिसरात एकूण २३० व त्यापेक्षा जास्त निवासी सोसायटी आहेत, त्यामधील सर्व नागरिकांना जलतरण तलाव व बॅडमिटंन चा सरावासाठी  पिंपरी, कासारवाडी,पिंपळे गुरव, थेरगाव, किवा खासगी ठिकाणी येथे जावे लागते.

नागरिकांची ही  परवड पाहता पिंपळे सौदागर येथे आता गार्डनची गरज नसल्याने तसेच सर्वात जास्त कर भरणारे नागरिक या परिसरात राहतात, त्या करदात्यास सोयीसुविधा देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिक पिंपळे सौदागर परिसरात जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल बांधावा अशी सातत्याने मागणी करत असतात मुळात नागरिकांची हि मागणी रास्त असल्याने  याचा विचार करता पिंपळे सौदागर मधील नागरिकांना या परिसरात  जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉलची सुविधा देणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता मा. आयुक्त महोदय  पिंपळे सौदागर येथील सर्वे न. २१  मधील आरक्षण क्र. ३६१ गार्डन या आरक्षण बदलाचा निर्णय घेवून पिंपळे सौदागर येथे सुसज्ज जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करण्यात यावे , असे निवेदनात म्हटले आहे.