ओपन जीम साहित्य चोरुन नेण्यात आल्या बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा - सचिन काळभोर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ओपन जीम साहित्य चोरुन नेण्यात आल्या बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा - सचिन काळभोर

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - फ क्षेत्रिय अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग ह्यांनी सन २०२२ रोजी ओपन जीम नागरिकांना व्यायाम करण्यासाठी त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून ओपन जिम बसविण्यात आली.ओपन जीम साहित्य चोरुन नेण्यात आल्या बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच लवकरात लवकर पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग ह्यांनी नागरिकांना ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि,   निगडी भक्ती शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड मधील स्कीम नंबर 11 बिल्डिंग नंबर ४८ समोरील मधल्या जागेत फ क्षेत्रिय अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग ह्यांनी सन २०२२ रोजी ओपन जीम नागरिकांना व्यायाम करण्यासाठी त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आली होती. एक ते दीड महिन्यापूर्वी ओपन जीम साहित्य चोरुन नेण्यात आले असून त्या ओपन जीम साहित्य भंगार गोदामात विक्री करण्यात आली.  त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन यमुनानगर स्कीम नंबर 11 बिल्डिंग क्रमांक ४८ समोरील जागेमध्ये ओपन जीम साहित्य चोरुन नेण्यात आल्या बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच लवकरात लवकर पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग ह्यांनी नागरिकांना ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी  असे हि प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून भंगार माफिया ओपन जीम साहित्य चोरुन विल्हेवाट लावत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही जेष्ठ नागरिक महिला वर्ग शालेय विद्यार्थी ह्यांना व्यायाम करण्यासाठी ओपन जीम सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विविध भागात उपलब्ध करून देत आहे पण ओपन जीम सुरक्षा रक्षक ठेवण्यात येत नाही म्हणून ओपन जीम साहित्य चोरुन विल्हेवाट लावण्यात येत असून सदर प्रकार गंभीर असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देत आहे पण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत नाही ही खंत नागरिक व्यक्त करत आहे.