चिंचवडला रविवारी चारचौघींशी दिलखुलास गप्पा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवडला रविवारी चारचौघींशी दिलखुलास गप्पा
चिंचवडला रविवारी चारचौघींशी दिलखुलास गप्पा

महिला दिनानिमित्त दिशा फाऊंडेशनचा उपक्रम

पिंपरी/पुणे - दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (५ मार्च) चिंचवडला चारचौघी या प्रसिध्द नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न, समस्यांवर आधारित सविस्तर चर्चाही होणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सकाळी ११ वाजता हा गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांच्यासह चारचौघीचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार राज काझी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आकांक्षा पिंगळे, आय. आर. एस. माधुरी गरुड, राज्य काव्य पुरस्कार प्राप्त संगीता झिंजूरके यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येईल, त्यास प्राधान्य राहणार आहे. काही जागा राखीव असतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले आणि उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.