संदीप देशपांडे मारहाण प्रकरणात कामगार सेनेचा हात ?
शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली जे येतात, त्यांचे कोच कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्कीच घेतील.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
BMCतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे हल्ला – देशपांडे
वरुण सरदेसाई व आदित्य ठाकरे यांच्यावर देशपांडे यांचा संशय
मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे हल्ल्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भांडूपमध्ये कोकण नगर या विभागातून या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी ८ पथक तयार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. अशोक खरात हा ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असून त्यांच्यासोबत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामागील सूत्रधार मला माहिती आहे. मात्र, आता हल्ल्याबाबत पोलीस तपास सुरू असल्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
संदीप देशपांडे म्हणाले, माझ्यावर हल्ला कुणी केला?, हे मला माहिती आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून सगळे बाहेर येईलच. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली जे येतात, त्यांचे कोच कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्कीच घेतील. मात्र, हल्ल्यामागचा सुत्रधार कोण?, हे मला माहिती असले तरी आताच यावर बोलणे उचित ठरणार नाही.
संदीप देशपांडे म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक चौकशी केली. तसेच, सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचारीही पाठवले. मात्र, माझी सरकारला नम्रविनंती आहे की, आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. त्यामुळे आम्हाला सुरक्षेची गरज नाही. सुरक्षा द्यायचीच असेल तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना सरकारने आता सुरक्षा पुरवावी, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
बाळा कदमांच्या अटकेनंतर ४८ तासांत माझ्यावर हल्ला
संदीप देशपांडे यांनी नोंदवलेल्या जबाबातही वरूण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख आहे. त्यासोबतच, संदीप देशपांडे यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोविड काळातील भ्रष्टाचारप्रकरणी आम्ही मुंबई पालिका आयुक्तांकडे एक तक्रार केली होती. याप्रकरणी इकोनॉमिक्स अफेअर्स विंगने बाळा कदम यांना अटक केली. त्यानंतर माझ्यावर हल्ला झाला, असं संदीप देशपांडे म्हणाले. बाळा कदम हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे संदीप देशपांडे यांचा रोख ठाकरे गट आणि खासकरून संजय राऊतांवर असल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल, शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. याप्रकरणी तक्रार दाखल करताना संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचं नाव जबाबात नोंदवलं आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. हा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला असावा, असा संशय संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगत फर्निचर घोटाळा झाला असल्याचंही संदीप देशपांडे यांनी आज सांगितलं. याबाबत आपण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचीही भेट घेतली होती. याप्रकरणाचा सुगावा लागला असेल म्हणून माझ्यावर हल्ला झाला असेल, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच, कोविड काळातील भ्रष्टाचारप्रकरणी इकोनॉमिक्स अफेअर्स विंगने बाळा कदम यांना अटक केली, त्यानंतर ४८ तासांनी माझ्यावर हल्ला झाला, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन्ही कंपन्यांचा टर्नओव्हर कोविड काळाच्या आधी दहा लाख होता. मात्र, कोविड काळानंतर या दोन्ही कंपन्यांचे टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात केले आहेत. कोविड काळात या दोन्ही कपन्यांना कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळाले होते. कोविड सेंटर्समध्ये बेडशीट, गाद्या, कॉट पुरण्याचं कंत्राट यांना मिळालं होतं. मात्र, या दोन्ही कंपन्यांकडून कोविड सेंटर्सना साहित्य पुरवण्यातच आले नाहीत, तरीही भरमसाठ बिले पाठवण्यात आली.
साहित्य पुरवण्यासाठी आधी परसेच ऑर्डर किंवा असेट असावी लागते, या कंपन्यांचं तसंही काही नाही, असंही संदीप देशपांडे यांनी सांगतिलं. याप्रकरणात ज्या व्यक्तीचा हात आहे, त्याचं नाव देढिया आहे. या व्यक्तीचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत फोटो आहेत. याच माणसाला मुंबई पालिकेतील विविध वॉर्डाची फर्निचरचे कंत्राट कसे मिळतात? हे सर्व घोटाळे मी येत्या दोन दिवसांत बाहेर काढणार होतो. याचा सुगावा त्यांना लागला असावा, म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला, असं संदीप देशपांडे म्हणाले.
त्यांना माझं तोंड बंद करायचं होतं तर त्यांनी माझ्या थोबाडावर मारायला पाहिजे होतं. त्यांनी माझ्या डोक्यावर, हातावर मारलं. तुम्ही माझं थोबाड बंद करू शकणार नाहीत, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करूच, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.