चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यांचे झाले डिपॉझिट जप्त

२६ उमेदवारांची एकूण सुमारे १ लाख ९० हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यांचे झाले डिपॉझिट जप्त

चिंचवड - चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे २६ उमेदवारांची प्रवर्ग निहाय जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुकीमधील या उमेदवारांची सुरक्षा ठेव जप्त रक्कम "इतर प्रशासकीय सेवा - ०२- निवडणूक - १०४-शुल्क, दंड आणि जप्ती. इतर पावत्या – जप्त केलेली सुरक्षा ठेवींची रक्कम" या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात आली आहे, अशी माहिती श्री ढोले यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२३ कार्यक्रम दि. १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीमध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. दि. २६ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान झाले, तर दि. २ मार्च रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १५८ नुसार जर एखादा उमेदवार त्या मतदार संघातील एकूण उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांपैकी १/६ इतकी मते मिळवू शकला नाही (NOTA वगळून) तर उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम ३४, १ (अ) नुसार अन्वये जमा केलेली अनामत रक्कम खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ हजार रुपये इतकी आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १५८ अन्वये या उमेदवारांना या पोटनिवडणूकीतील एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे अशा प्रवर्ग निहाय उमेदवारांची जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत २ लाख ८४ हजार ३९७ वैध मते आहेत. त्याप्रमाणात एक षष्टांश (१/६) पेक्षा अधिक म्हणजेच ४७ हजार ४०० इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने २ उमेदवार वगळता इतर सर्व २६ उमेदवारांची एकूण सुमारे १ लाख ९० हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे.

अनामत रक्कम जप्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये राहुल कलाटे, सुभाष बोधे, गोपाळ तंतरपाळे, सिद्दिक शेख, प्रफुल्ला मोतलिंग, बालाजी जगताप, किशोर काशीकर, श्रीधर साळवे, दादाराव कांबळे, डॉ. मिलिंदराजे भोसले, अमोल(देविका) सुर्यवंशी, रफिक कुरेशी, मनोज खंडागळे, तुषार लोंढे, राजू काळे, हरिष मोरे, अॅड.सतिश कांबीये, जावेद शेख, सुधीर जगताप, अजय लोंढे, मिलिंद कांबळे, मोहन म्हस्के, सोयलशहा शेख, सतिष सोनावणे, चंद्रकांत मोटे आणि अनिल सोनवणे यांचा समावेश आहे.