रिलायन्स फाउंडेशनकडून मुंबईत कोरोना रूग्णांसाठी 875 बेडची व्यवस्था  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रिलायन्स फाउंडेशनकडून मुंबईत कोरोना रूग्णांसाठी 875 बेडची व्यवस्था  

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक होत आहे. सर्वत्र आक्रोशाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. या संकटकाळात बर्‍याच मोठ्या संस्था आणि कंपन्यांनीही देशासाठी मदतीसाठी हात पुढे केला. नुकतेच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही 135 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तर आता रिलायन्स फाउंडेशनने कोरोना रूग्णांसाठी 875 बेडचीही व्यवस्था केली आहे.
 
वास्तविक, रिलायन्स फाउंडेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वैद्यकीय गरजा लक्षात घेता त्यांनी मुंबईत ऑपरेशन्स वाढवले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि ट्रायडंट, बीकेसी या रुग्णालयात 145 आयसीयू सुसज्ज असलेल्या सुमारे 875 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
दुसर्‍या निवेदनानुसार एनएससीआयमधील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये 650 वैद्यकीय बेडची व्यवस्था केली जाईल. निवेदनात असेही म्हटले आहे की रिलायन्स फाऊंडेशन पुढील 100 नवीन आयसीयू बेडचे व्यवस्थापन करेल, जे 15 मे 2021 पासून टप्प्याटप्प्याने चालू केले जातील. या व्यतिरिक्त सर्व कोविड रूग्णांवर एनएससीआय आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जातील.

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी सांगितले की, एकूण 145 आयसीयू बेड्ससह फाउंडेशन सुमारे 875 बेडचे व्यवस्थापन करेल. रिलायन्स फाऊंडेशन देशाच्या सेवेत नेहमीच अग्रणी आहे. रिलायन्स समूह सध्या गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दमण, दीव आणि नगर हवेलीला दररोज 700 टन ऑक्सिजन देत आहे.