दळणाचे दर १० रुपये किलो होणार ? वीज दरवाढीमुळे कंबरडे मोडणार

महावितरणकडून महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दोन वर्षांसाठी दरवाढ मागण्यात आली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दळणाचे दर १० रुपये किलो होणार ? वीज दरवाढीमुळे कंबरडे मोडणार

नागपूर - महावितरणची प्रस्तावित वीज दरवाढ लागू झाली तर त्याचा थेट परिणाम गृहकुटीर उद्योगावर होईल. साधे पीठाचे दळण हे एका किलोमागे दहा रूपयाने महाग होईल. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसणार आहे, असे वीज नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांनी स्पष्ट करीत महावितरणच्या प्रस्तावित वीजदरवाढीला तीव्र विरोध नोंदवला.

महावितरणकडून महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दोन वर्षांसाठी दरवाढ मागण्यात आली आहे. ही दरवाढ जास्त असल्याचा आरोप करत विविध ग्राहक संघटना, वीज कामगार संघटना, विविध उद्योजकांच्या संघटनांसह नागरिकांनी वनामती येथे झालेल्या आयोगाच्या सुनावणीत दरवाढीला कडाडून विरोध केला. महाराष्ट्र राज्य गृह कुटीर उद्योगचे शिवकुमार अग्रवाल यांनी दरवाढ झाल्यास दळण प्रतिकिलो १० रुपयांनी वाढण्याची शंका उपस्थित केली आहे.

महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दरवाढीची मागणी करीत याचिका दाखल केली. यात २०२३-२४ सोबतच २०२४-२५ साठीसुद्धा दरवाढ प्रस्तावित आहे. यावर आयोग निर्णय घेण्याअगोदर विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी घेत आहे. या अंतर्गत वनामती सभागृहात ई-जनसुनावणीला सुरुवात झाली. आयोगाने व्हिडिओ कान्फ्ररन्सिंगच्या माध्यमातून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक उद्योग संघटना व नागरिकांनी यादरम्यान आपले आक्षेप नोंदवले.