कसब्यातील जनतेच्या आशीर्वादासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ - देवेंद्र फडणवीस
कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई – कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा इथून मोठा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे सर्वच दिग्गज फेल ठरल्याचं बोललं जातं आहे.
या दरम्यान आता राज्यातील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील जनतेकडे 'आम्ही पुन्हा येऊ' अशी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार अश्विनीताई जगताप विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे. तर कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! असं ते म्हणाले.
तर आधीच्या निवडणुकांमध्ये दोन-तीनदा पडल्याने रवींद्र धंगेकरांना जनतेची सहानुभूती होती, ती महाविकास आघाडीला नव्हती. हेमंत रासने यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली. पण आम्हाला पराभव मान्य असून कोठे कमी पडलो, कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, याचे विश्लेषण करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
कसब्यातील पराभव आम्हाला मान्य आहे. गेल्या २८ वर्षांपासून येथे आम्ही जिंकत होतो, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा गड उद्ध्वस्त झाला होता का? प्रत्येक निवडणुकीत वेगळी समीकरणे असतात. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. आम्ही संस्काराने लढणारे असून पैशांचा वापर करून लढत नाही, तो आमचा धर्म नाही, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला. जे स्थानिक मनसे कार्यकर्ते धंगेकरांचे काम करीत होते, त्यांना पक्षातून काढले. पण आम्ही चिंचवड पोटनिवडणूक जिंकलो, विधान परिषद निवडणुकीत कोकणात जिंकलो, तीन हजार ग्रामपंचायती जिंकलो. नागपूरची जागा आम्ही लढवीत नाही. गेली १० वर्षे शिक्षक परिषद लढते व आम्ही पाठिंबा देतो. अमरावती व कसब्यातील पराभव मान्य असून त्याचे विश्लेषण आम्ही करणार आहोत. जर कसबा व चिंचवड दोन्ही जागा जिंकल्या असत्या, तर महाराष्ट्र जिंकू, म्हणता येईल का? कसब्यातील विजय महाविकास आघाडीचा नसून धंगेकरांचा आहे.