कैद्यांनी बनवलेल्या वस्तूच्या उत्पादनात येरवडा कारागृह अव्वल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कैद्यांनी बनवलेल्या वस्तूच्या उत्पादनात येरवडा कारागृह अव्वल

पुणे (प्रबोधन न्यूज) - पुण्यातील येरवडा कारागृहामधील कैद्यांनी वस्तूच्या उत्पन्नातून विक्री करून महाराष्ट्रातील इतर कारागृहापैकी नंबर एकच कारागृह म्हणून सरकारने जाहीर केलेल्या यादीतून जाहीर झाले आहे. राज्य कारागृह विभागाने सामायिक केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, येरवडा कारागृहाने 2021-22 या आर्थिक वर्षात कैद्यांनी बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीतून 2.99 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहाने 1.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह 1.72 कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर नागपूर मध्यवर्ती कारागृहाने 1.54 कोटी रुपयांचे योगदान राज्य किटीला दिले आहे.

येरवडा कारागृहातील कैदी हे काम करून केवळ रोजंदारीतून पैसे कमावत नाहीत, तर कारागृह विभागाच्या एकूण कमाईला हातभार लावत आहेत. येरवडा कारागृहातील 10हून अधिक उत्पादन युनिटमध्ये कैदी सुतारकाम आणि लोहारकाम करतात. आकडेवारीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी 76.67 लाख रुपयांची उत्पादने सुतारकाम विभागाद्वारे तयार केली आहेत, तर लोहार बनवलेल्या उत्पादनांची किंमत 58.90 लाख रुपये आहे. येरवडा कारागृहात कारागृह विभागामार्फत चालवल्या जाणार्‍या इतर उत्पादन युनिट्स आणि सेवांमध्ये पॉवरलूम, हातमाग, टेलरिंग, लेदर वर्क, पेपर फॅक्टरी, लॉन्ड्री आणि बेकरी उत्पादने यांचा समावेश आहे. येरवडा तुरुंगाच्या आऊटलेटवर विविध लाकूड उत्पादने, कोल्हापुरी चामड्याची चप्पल आणि बेकरी उत्पादने उपलब्ध आहेत. ती खूप लोकप्रिय आहेत.

या उपक्रमाद्वारे कैद्यांना कौशल्याने सुसज्ज करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांना काम मिळेल. असे गृहीत धरले जाते की, कौशल्ये शिकल्यानंतर ते त्यांच्या भूतकाळातील गुन्हेगारीकडे परत जाण्यापेक्षा समाजात चांगले माणूस बनतील. त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी आमच्याकडे आणखी काही योजना आहेत, ज्यांची अंमलबजावणी केली जात आहे. येरवडा कारागृह राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या कारागृहांपैकी एक आहे. हे अधिकृतपणे 2,449 कैद्यांना सामावून घेऊ शकते. आज रोजी मात्र दोषी आणि अंडरट्रायलसह 5,996 कैदी येथे दाखल असल्याची माहिती अमिताभ गुप्ता, तुरुंगाचे राज्य अतिरिक्त महासंचालक, यांनी दिली आहे.