चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप ३६ हजार मतांनी विजयी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप ३६ हजार मतांनी विजयी

चिंचवड – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत. अश्विनी जगताप यांच्या विजयाने पिंपरी-चिंचवडला दोन महिला आमदार लाभले आहेत. या अगेदर भाजपच्या उमा खापरे यांची नुकतीच विधान परिषदेवर निवड झाली आहे. अश्विनी जगताप यांनी ३६ हजार मतांपेक्षा जास्त लीडने विजयी झाल्या आहेत.

त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव झाला आहे. जी भीती होती तीच शेवटी खरी ठरली आहे. राहुल कलाटे यांची बंडखोरी नाना काटे यांना भोवली आहे. उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना चांगली मते मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेसचे) उमेदवार नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला आहे.

नाना काटे व राहुल कलाटे यांच्या मतांची बेरीज केली तर ती अश्विनी जगताप यांच्या मतापेक्षा जास्त होईल. पण महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मतांची विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना झाला आहे.

पिंपरी चिंचवडसाठी ५०.४७ टक्के मतदान झाले होते. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. तरी प्रमुख लढत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत होती. ३७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. ३७ व्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते तर नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते तर राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मते पडली आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीपासून अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. नाना काटे ज्या प्रभागातून नेतृत्व करतात त्या पिंपळे सौदागर आणि रहाटणी भागात काटे यांना काहीसे मताधिक्य पहायला मिळाले. त्यानंतर वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख या भागात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे बाजी मारतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, २३, २४ आणि २५ व्या फेरीतील आकडेवारी पाहता कलाटे यांच्या वाट्याला कमी प्रमाणात मते आली आहेत.

चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील मतमोजणी होताना स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या सहानुभूतीचा ‘फॅक्टर’ मोठ्या प्रमाणात चाललेला दिसून आला. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे मला नक्कीच फायदा झाला आहे, असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पाच ते दहा हजार मतांच्या आघाडीने अश्विनी जगताप आघाडी वरती होत्या. त्यात नाना काटे आणि राहुल कलाटे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी याठिकाणी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. त्यानंतर झालेल्या मत मोजणीत सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागातील मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी १० हजाराचे आघाडीवर असणारे जगताप यांनी थेट २५ हजारांच्या पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आणि विजयी झाल्या.

उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना सर्वांनी विनंती करूनही त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नाना काटे यांचाच प्रचार करावा व त्यांना निवडून आणावे असा आदेश दिला. स्वतः आदित्य ठाकरे हेही मतदारसंघात प्रचार फेरीत सामिल झाले होते.

एवढेच नाही तर राहुल कलाटे यांना जे शिवसैनिक मदत होते अशा सात कार्यकर्त्यांचे निलंबन झाले. मात्र हे करताना राहुल कलाटेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याची सर्वत्र चर्चा झाली. मीडियामधूनही या कारवाईवर शंका उपस्थित करण्यात आली. तेव्हा असे वाटले की आता राहुल कलाटेंवरही कारवाई होईल. परंतु तसे न करता उलट ज्या सात शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. त्याचा संदेश मतदारांमध्ये चुकीचा गेला व त्याचाही परिणाम नाना काटेंच्या मतांवर झाल्याचे बोलले जात आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे किमान १५ ते २० हजार मतदान आहे. वंचित आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीत राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा झाली होती. त्यामुळे निवडणुकीत वंचितने कलाटे यांच्या पारड्यात मते टाकली. परिणामी, महाविकास आघाडीची काही मते कमी झाली.

तर राहुल कलाटेंनी फक्त काटेंचीच नाही, तर भाजपाचीही मतं घेतली. आयटी पार्कमधली मतं कलाटेंनी घेतली आहेत. त्यामुळे असं म्हणता येत नाही की राहुल कलाटेंना पडलेली मतं फक्त नाना काटे यांचीच आहेत. त्यानं फरक पडत नाही. पण तिथे त्यांचा पराभव झालाय हे त्यांनी मान्य केलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.