महिला काँग्रेसचे उपोषण स्थगित
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, पुणे (दि. २० मे २०२२) सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे पदाधिकारी, अधिकारी ही लोकशाहीची दोन चाके सुरळीत चालल्यास सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील आणि लोककल्याणाची कामे होतील असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गुरुवार दि. १९ मे पासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पाणीप्रश्नावर १२ महिलांनी उपोषण सुरू केले होते. सुनील केदार यांच्या उपस्थितीत या महिलांनी उपोषण स्थगित केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पूजा आनंद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी आदी उपस्थित होते.
चिंचवड शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा देऊन देखील पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही याचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणात माजी नगरसेविका निर्मला कदम, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या छायावती देसले, डॉ. मनीषा गरुड, रिटा फर्नांडिस, नंदा तुळसे, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, सोनू दमवाणी, आशा भोसले यांनी सहभाग घेतला होता.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपोषण स्थळी दाखल होताच पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील तेथे येऊन महिलांचे निवेदन स्वीकारले. उपोषण समाप्त झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासन भवनात झालेल्या बैठकीत राजेश पाटील यांनी आश्वासन दिले की, आगामी दीड महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे याबाबत तपासणी पथक नेमून पुढील आठ दिवसात त्याचा अहवाल देखील जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी देखील उपस्थित महिलांना यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, विश्वनाथ जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, उमेश खंदारे, बाबा बनसोडे, सीमा हलकट्टी, सुप्रिया पोहरे, भारती घाग, शितल सिकंदर, सुवर्णा कदम, राधिका अडागळे, शिल्पा गायकवाड, शिवानी भाट, सरला जॉय, मंगला जोगदंड, नागेंद्र भंडारी, मीना रानडे, कुसुम वाघमारे, विमल खंडागळे, कांती देवी, काशीबाई पुलावळे, पुष्पा रेवरे, लक्ष्मी श्रींगारे, किरण नढे, सौरभ शिंदे, विजय ओव्हाळ, अनिता अधिकारी, सिस्टर साळवी, सुनिता जाधव, उमेश बनसोडे, हरीश डोळस, मोहसिन शाह, करण गिल, आण्णा कसबे, जुबेर खान, अर्जुन लांडगे, के. हरिनारायण, हिराचंद जाधव, किरण खाजेकर, नितीन खाजेकर, विशाल सरवदे, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले, मिलिंद फडतरे, आकाश शिंदे, राहुल ओव्हाळ, जेवियर ऍंथोनी, आबा खराडे आदी उपस्थित होते.