राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल; जुन्या केसेसेही बाहेर काढल्या
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
औरंगाबाद, दि. ३ मे - चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबदेतील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या भोंग्याच्या आवाजावरुन राज ठाकरे यांनी रान उठवलं मात्र आपल्याच सभेत राज यांनी लाऊड स्पीकरच्या (भोंग्याची) आवाजाची मर्यादा पाळली नाही. पोलिसांनी राज ठाकरे यांना १६ अटी शर्थीचं पालन करण्यास सांगितलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी त्यातील तब्बल १२ अटींचं उल्लंघन केलंय.
रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. राज यांची वक्तव्य तपासल्यानंतर त्यात दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात आल्याचे आढळून आले. यासह सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचे पालन झाले, कशाचे उल्लंघन झाले, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला.
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा आणि नियमभंग केल्याबाबतचा अहवाल गृहखात्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. या अहवालाचा आढाव घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक मैदानात सभा पार पडली. या सभेला परवानगी मिळण्यावरुनही बराच वाद झाला. पण अखेर आठवडाभराच्या चर्चेनंतर पोलिसांनी आयोजकांना सभेसाठी परवानगी दिली. परवानगी देताना राज ठाकरे यांना १६ अटी घालून देण्यात आल्या. यामध्ये सभेसाठी लोकांची संख्या, लाऊड स्पीकरचा आवाज, आक्षेपार्ह वक्तव्य न करणं, चिथावणीखोर वक्तव्य न करणं, अशा अनेक अटी घालून देण्यात आल्या होत्या. पण यातील बहुतांश अटींचं राज ठाकरे यांनी उल्लंघन केलं.
सभेची परवानगी मागणारे राजीव जावळीकर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटी-शर्थींचा भंग केला म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे. काय होऊ शकते कारवाई चिथावणीखोर भाषण, दोन गटांत तेढ निर्माण करणे अशा स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यांच्याविरुद्ध पुरावे आढळतील त्यांना अटक होऊ शकते. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. पोलिसांना यात जामीन देण्याचा अधिकार नाही, यासाठी न्यायालयात जावे लागेल.
या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार कलम 116, 117, 153 भारतीय दंड विधान 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये राज ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून त्यानुसार राजीव जावळीकर व इतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2012 मधील हे प्रकरण आहे. सांगलीत मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा काही मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी आता शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
राज ठाकरेंच्या सभेस मिळणारा प्रसिसाद उदंड आहे. लोक मोठ्या संख्येने त्यांच्या सभांना गर्दी करतात. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने काहींना मतपेटींची चिंता लागली आहे. पण आमची काही हरकत नाही. मनसे तयार आहे. राज ठाकरेंच्या अटकेसाठी मनसेची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे-पालघर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, सभेला परवानगी न देणं, जाचक अटी टाकणं, या आधी एखाद्या सभेला अशा अटी होत्या का? आम्हाला वाटतं की, राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव आहे. आम्हाला खात्री आहे की, त्यांची कलमे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. आम्हाला घाबरवण्यासाठी असे गुन्हे दाखल केले जात आहेत, पण महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, आंदोलन होणारच असेही ते म्हणाले.