शरद पवार कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व अध्यक्ष शरद पवार हे कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "कसबा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार मला भेटून गेले आहेत. त्यांनी मला एखादी चक्कर टाका असे सांगितले आहे. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी जावं लागेल (कसबामध्ये गेलं, तर चिंचवडमध्ये पण जावं लागेल)", अशी माहिती पवारांनी दिली आहे.
भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांची प्रकृती बरी नसताना ते भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. बापट गंभीर आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवल्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. पवारांनीही यावर भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले की, "त्यांना प्रचारात आणणे, हे भाजपला गरज होती का ठाऊक नाही. गिरीश बापट यांना मी भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे", अशी चिंता पवारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शरद पवारांशी चर्चा करूनच 2019 मधील पहाटेचा शपथविधी झाला होता, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा पवारांना विचारण्यात आलं. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, त्या विषयावर भाष्य करून त्यांचे (देवेंद्र फडणवीस) आणखी महत्त्व वाढवावं असे मला वाटत नाही. त्यांनाच विचारायची गरज आहे की इतक्या दिवसांनी हे वक्तव्य का काढलं? असं सांगून त्यांनी फडणवीसांच्या दाव्यातील हवा काढून टाकली.