भाजपच्या नकारानंतर उत्पल पर्रिकर पणजीतूनच 'एकला चालो रे' ची घोषणा! अपक्ष म्हणून लढणार 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपच्या नकारानंतर उत्पल पर्रिकर पणजीतूनच 'एकला चालो रे' ची घोषणा! अपक्ष म्हणून लढणार 
पणजी -
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार असल्याची घोषणा केली आहे. ‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत पक्ष मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधीसाधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी मोठी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केली. 

‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूप जणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असेही उत्पल पर्रीकर म्हणाले. ‘गेल्यावेळीही मला संधी नाकारली आहे. आताही नाकारले आहे. इथल्या लोकांना माहीत आहे. हा मनोहर पर्रिकराच्या पार्टीतील निर्णय वाटत नाही. कधी तरी जनतेसाठी थांबावं लागतं. मी अपक्ष लढतोय. माझं राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवलं आहे. मी कोणत्याही पद आणि मंत्रीपदासाठी मी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे. हे युद्ध कठीण आहे. मला काही तरी मला मिळेल यासाठी मी काही करत नाही. पणजीचे लोक 30 वर्ष माझ्या लोकांसोबत होते. येथील वर्ग उच्च शिक्षित आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे. माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही’, अशी खंतही यावेळी उत्पल यांनी व्यक्त केलीय.

उत्पल पर्रिकर यांचा फडणवीसांना सवाल
पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.