माझ्याकडे चिंचवड मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन – राहुल कलाटे

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीत चिंचवडचा वारस कसा असावा याबाबतचा निर्णय तरुणाई घेईल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

माझ्याकडे चिंचवड मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन – राहुल कलाटे
पिंपरी - नगरसेवक ,महापालिकेतील गटनेता या नात्याने वाकड परिसरात अनेक विकास कामे केली आहेत . शहर पातळीवरही अनेक कामांसाठी पाठपुरावा केला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीत चिंचवडचा वारस कसा असावा याबाबतचा निर्णय तरुणाई घेईल व या निवडणुकीत मला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदारांना दिला आहे.
 कलाटे यांनी म्हटले आहे की ,मी स्वतः चिंचवड मतदार संघाच्या विकासासाठी कामे केली आहेत. विविध प्रश्नांवर आंदोलने ही केली आहेत त्याच बळावर मी जनतेच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढवत आहे .
वाकड परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी अनेक विकास कामे केली आहेत. त्यात तानाजी तुकाराम कलाटे उद्यान, ऑक्सिजन पार्क ,मुंबई बेंगलोर हायवे ते ताथवडे गावठाण डीपी रोड, पुनावळे वॉटर टँक, वाकड उद्यान व जॉगिंग ट्रॅक ,वाकड उद्यान सुशोभीकरण ,भगवान नगर नवीन पाण्याची टाकी, वाकड दशक्रिया घाट इत्यादी कामांचा समावेश  आहे. बालवडकर पेट्रोलियम ते ओमेगा पेरोडाइज ,वाकड उड्डाणपूल ते काळा खडक, दत्त मंदिर रोड ,वाकड गावठाण या भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत.
विकास कामे करत असताना त्यात अडथळे आणण्याचे उद्योग काही मंडळींनी केले. शंभर कोटीची विकास कामे मंजुरीसाठी असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्षाला सांगून ती कामे स्थायी समितीत रोखली त्याबाबत मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नगर विकास विभागामार्फत ही कामे जनतेच्या विकासासाठी मार्गी लावली.अनेक विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. दि.24 मार्च 2021 रोजी  मुंबई – बेंगलोर  रस्त्यावर  ताथवडे  व पुनावळे येथे नविन सब-वे,  भूमकर चौक, वाकड येथे  नविन  सब- वे साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मुंबई – बेंगलोर  रस्त्यावर  ताथवडे  व पुनावळे येथे नविन सब-वे करणे, भूमकर चौक, वाकड येथे  नविन  सब- वे करणे व महापालिका हद्दीतील वाकड ते रावेत किवळे सर्व्हिस रस्ता विकसीत करणे कामी पिंपरी चिंचवड  महापालिकेकडे हस्तांतरीत करणे बाबत केंद्रीय रस्ते  वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत निवेदन दिले.
 पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील ताथवडे येथून जाणा-या मुंबई-बंगळुरु रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील ताथवडे पुनावळे हद्दीपासून पुनावळे रावेत पुलापर्यंत आणि  रावेत गावठाणापासून किवळे हद्दीतील मुकाई चौकापर्यंत मंजुर विकास योजनेत असलेली 30 मीटर रस्ता रुंदी 45 मीटर करण्यासाठीच्या फेरबदलास मान्यता देण्याची मागणी 9 एप्रिल 2022 रोजी राज्य सरकारकडे केली.
याबाबत तत्कालीन नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांची  भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर शिंदे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाच्या प्रधानसचिवांना दिले . शिवसेनेचे संपर्कप्रमुख माज़ी मंत्री सचिनभाऊ अहिर हेही त्यावेळी उपस्थित होते.
मेट्रो, शहराला 24 तास पाणीपुरवठा हे राज्य शासनाशी संबंधित प्रश्न आहेत पण हे प्रश्न सोडविण्यात इथल्या नेतृत्वाला अपयश आले आहे माझ्याकडे विकासाचे व्हिजन आहे शहराची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. चिंचवड चा वारस कसा असावा याचा निर्णय तरुणाई घेईल विविध विकास कामे मार्गी लावल्याने जनमत माझ्या सोबत आहे त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईन असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला आहे.