ते आले..त्यांनी पहिलं .. आणि त्यांनी जिंकलं ..! (व्हिडिओ)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ते आले..त्यांनी पहिलं .. आणि त्यांनी जिंकलं ..! (व्हिडिओ)
ते आले..त्यांनी पहिलं .. आणि त्यांनी जिंकलं ..! (व्हिडिओ)

नाना काटे यांच्या रहाटणी परिसरातील ‘बाईक रॅली’ला दणदणीत प्रतिसाद !
हस्तांदोलन, सेल्फी, शुभेच्छांनी वाढला प्रचारफेरीचा उत्साह !

पिंपरी, दि. १५ - बुधवारी रहाटणी परिसरातील वातावरण काही निराळेच होते.. सकाळपासूनच रस्ते गर्दीने ओसंडू लागले.. ठिकठिकाणी मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधून घेत होते.. फटाक्यांची जोरदार आतषबाजी.. फुलांचा वर्षाव.. बाईकचा दणदणाट... अशा या प्रसन्न वातावरणात रहाटणीकर उत्सुकतेने 'त्यांची' वाट पाहत होते... तेवढ्यात  'ते आले.. त्यांनी पाहिलं.. आणि त्यांनी जिंकलं..!' ते होते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेतले आणि लोकप्रिय ठरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे ! जागोजागी त्यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय त्यांच्याशी हस्तांदोलन करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसला. महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या तर तरुण मुला- मुलींची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली. 

रहाटणी गावठाणापासून सुरू झालेल्या प्रचारफेरीत नाना काटे यांच्यासोबत माजी नगरसेवक संतोष बारणे,  शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रेरणा बँकेचे माजी अध्यक्ष कांतीलाल गुजर, माजी नगरसेविका मायाताई बारणे, प्रेरणा सहकारी बँकेचे अध्यक्ष तुकाराम गुजर, माजी नगरसेवक कैलास बारणे, सतीश दरेकर, यांच्यासह गोरक्षनाथ पाषाणकर, विशाल नंदूशेठ बारणे, संभाजी बारणे, विशाल पवार, शरद वारणे, प्रशांत संपकाळ, प्रभाकर ववले, अभिजित आल्हाट, विजय गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रहाटणीच्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर  गोडांबे कॉर्नर, नखाते वस्ते चौक, श्रीनगर परिसर,  नखाते नगर, शिवराज नगर, साई चौक, गणेश मंदिर, समता नगर, संत तुकारामनगर, गणेश बँक, नंदनवन कॉलनी, कृष्णा चौक ज्ञानेश पार्क, सह्याद्री पार्क, बळीराज कॉलनी, रामनगर, थोपटे लॉन्स आदी भागांतून ही प्रचारफेरी काढण्यात आली. चौका-चौकात नाना काटे यांचे रहाटणीकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांनी काटे यांना वेळी विजयाबद्दल आशिर्वाद दिले. नानांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. माता-भगिनींनीही त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. लहान मुले देखील आपल्या आवडत्या नानांचे स्वागत करायला थांबलेली होती. नानाही या चिमुकल्यांना उचलून घेत त्यांचे लाड करीत होते. त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते. 
मतदारांच्या गाठीभेटी घेत निघालेले नाना काटे हे सर्वांचीच आस्थेने चौकशी करीत होते. चिंचवड विधानसभेमध्ये परिवर्तन घडवून विकास साध्य करावयाचा असेल तर मला तुमच्या सहकार्याची, आशिर्वादाची गरज आहे. तुम्ही मला एक संधी द्या, मी मतदारसंघाचा कायापालट करतो, असे  आश्वासन नानांनी मतदारांशी संवाद साधताना दिले. मतदारांनीही यावर आमची मते तुम्हालाच, असा प्रतिसाद दिला. शुभेच्छांचा स्वीकार करत, सर्वांशी मनमोकळा संवाद साधत ही  प्रचारफेरी काढण्यात आली.
यावेळी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये प्रचंड संख्येने युवक सामिल झाले होते. या वेळी तरुणांमध्ये जोश पाहायला मिळाला. परिवर्तन अटळ आहे,  नाना काटे झिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेस झिंदाबाद, येऊन येऊन येणार कोण नानांशिवाय आहेच कोण! अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

https://youtu.be/sk2thPj7xPA