मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटलांवर मोठी जबाबदारी ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटलांवर मोठी जबाबदारी ?

भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार?

पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भाजपला जशास तसे उत्तर देऊ शकणाऱ्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या रुपाली पाटील – ठोंबरे यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांच्या अगोदर चित्रा वाघ या पदावर कार्यरत होत्या. परंतु विधानभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाची कास धरल्यामुळे त्यांच्या जागेवर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. रुपाली चाकणकर यांनी आपल्या कार्यकाळात चांगलाच ठसा उमटविला होता. विशेषतः त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर तोफ डागून भाजपला अनेकवेळा अडचणीत आणले होते. असे असतानाही त्यांचा राजीनामा का घेण्यात आला याचे अनेकांना कोडे पडले आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद दिल्यामुळे या पदावर रुपाली पाटील-ठोंबरे यांची वर्णी लावण्याचे राष्ट्रवादीमध्ये निश्चित झाल्यानंतर चाकणकर यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत या रुपाली पाटील जाणून घेऊयात.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्या कार्यरत होत्या. त्यांनी मनसेत असताना मनसेच्या तिकिटावरून निवडून येत नगरसेवक पदही भूषविले आहे. पाटील या अत्यंत धडाडीच्या, उत्कृष्ट वक्त्या आहेत तसेच त्या उत्तम कायदेतज्ञही आहेत. त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने केली आहेत. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. उपेक्षितांचे, पिडीतांचे प्रश्न सोडविताना त्या अक्षरशः रणरागिणीचा अवतार धारण करताना अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळेच पत्रकारांनीही त्यांना मनसेच्या रणरागिणी, मनसेच्या फायरब्रँड, मनसेच्या तोफखाना अशी विशेषणे त्यांना बहाल केली आहेत.

पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असत. कोविड काळात अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सातत्याने भूमिका घेतात. रुपाली पाटील यांना एकदा जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्या वेळेस त्या पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेतर्फे निवडणूकही लढविली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या रुपाली पाटील यांनी काही ठराविक नेते व कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच त्यांना राष्ट्रवादीत मोठे पद मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रुपाली पाटील यांच्याकडे जाईल हे निश्चित मानले जात आहे.