मराठा मोर्च्याच्या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मराठा मोर्च्याच्या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   जालना येथे उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील मराठी क्रांती मोर्चा ने आज शनिवारी (दि. ९) पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली होती. बंदमध्ये भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले होते. तसेच व्यापारीवर्ग आणि नागरिकांनी देखील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता बहुतेक बाजारपेठा, दुकाने सर्व बंद होती. तर शाळा सुरु होत्या. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून शहरातील नागरिक मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे बंदमधून पहावयास मिळाले.आंदोलकांनी दिवसभर शांततेत आंदोलन केले.

पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासूनच संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांबरोबरीनेच जिल्हा प्रशासनाने देखील चोख व्यवस्था ठेवली होती. पिंपरी-चिंचवड शहरात सर्व नदी घाटांवर अग्निशमन दल आणि बचाव पथके तैनात होती. तसेच, शासकीय कार्यालयांमध्ये बचाव पथके तैनात करण्यात आली. राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृतीदल, दंगा काबू पथक, सर्व वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खडा पहारा दिला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलकांनी उपस्थितांना संबोधित केले. आंदोलन संपल्यानंतर शांततेने सर्वांनी परतावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले. त्याला उपस्थितांनी देखील प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरात कोठेही तोडफोडीच्या घटना घडल्या नाहीत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. एक मराठा, लाख मराठा या घोषणेने पिंपरी चौक आंदोलकांनी दणाणून सोडला होता.