म्हाडा पेपरफुटी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने; संतप्त आव्हाड म्हणाले..

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

म्हाडा पेपरफुटी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने; संतप्त आव्हाड म्हणाले..

मुंबई -

सोमवारी म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  तर, अभाविपच्या या आंदोलन विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षा पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यामधील मराठवाडा कनेक्शनही पुन्हा एकदा समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती.आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. यामुळे औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त सवाल केला की, ज्या मंत्र्याने तीन दिवस मेहनत घेऊन, सगळ्या बातम्या गोपनीय ठेवत आरोपींना पकडून दिलं. राज्यातील पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पेपर फुटायच्या आधी सतर्कता बाळगत परीक्षा रद्द केली. परीक्षेत किंवा पेपर फोडण्यासाठी पैशाचा वापर होणार नाही, याची दक्षता घेतली, त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी? एबीव्हीपीचे पेपर फोडणाऱ्यांशी लागेबांधे आहेत का की परीक्षेला बसलेले विद्यार्थी यांचे होते, असा सवालही आव्हाड यांनी केला.