अमरावतीमध्ये अखेर भाजपाचा पराभव, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अमरावतीमध्ये अखेर भाजपाचा पराभव, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

अमरावती, (प्रबोधन न्यूज) - अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत धीरज लिंगाडे आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली. मागील २८ तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. अखेर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यात भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांचा विजय झाला आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत धीरज लिंगाडे आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली. यावेळी एकूण २३ उमेदवार रिंगणात उभे होते. अमरावती मतदारसंघात ३० जानेवारी रोजी एकूण ४९.७५ टक्‍के मतदान झाले होते.

पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती. वैध मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता.