अनेकांना अजूनही महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातच खितपत पडावा असं वाटतं ! - राज ठाकरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अनेकांना अजूनही महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातच खितपत पडावा असं वाटतं ! -  राज ठाकरे
नाशिक - 
अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गाला(ओबीसी) २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तर, राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं असा भाजपाकडून आरोप केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
पत्रकार परिषदेत या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने यांना मोजणी करायला कशी काय सांगितली. मग कोर्टात याविरोधात कसा काय निर्णय आला? हे काही इतकं दिसतं तेवढं सरळ नाही प्रकरण. मी अनेकदा हा विषय बोललेलो आहे की, आपण जोपर्यंत जातीपातीमधून बाहेर येणार नाही. तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्टी, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे. मुख्य विषय सगळे बाजूला पडतात आणि कुठल्याही गोष्टीची उत्तर तुम्हाला सापडतच नाहीत.'
याप्रसंगी राज ठाकरे यांनी एसटी कर्मचारी संप, परीक्षांमधील गोंधळ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हिंदुत्वाबद्दलचं विधान आदी मुद्य्यांवरील प्रश्नांवर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या आणि कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल परब यांच्यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला. 'एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी राज्य दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.