आसाराम बापूला आजन्मठेपेची शिक्षा; शिष्येवर केला होता बलात्कार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
गांधीनगर (गुजरात) (प्रबोधन वृत्तसेवा) - जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला आणखी एक जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. एक दशक जुन्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गांधीनगर सत्र न्यायालयाने स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबाद येथील आश्रमात एका शिष्याला वासनेचा बळी बनवणाऱ्या आसारामला सोमवारी न्यायालयाने दोषी ठरवले. शिक्षेवर झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी न्यायालयाने आस्थेच्या आडून घृणास्पद कृत्य करणाऱ्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
2013 मध्ये पीडितेने आसाराम बापूंविरोधात तक्रार दाखल केली होती. बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, बळाचा वापर यासह अनेक गुन्ह्यांसाठी न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले. आसारामची पत्नी आणि मुलीसह सहा आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. पीडितेच्या लहान बहिणीला आसारामचा मुलगा नारायण साई याने वासनेची शिकार बनवली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
77 वर्षांच्या आसाराम बापूवर 2013 मध्ये 16 वर्षांच्या मुलीवर जोधपूरजवळच्या एका आश्रमात बलात्कार करण्याचा आरोप आहे. मुलीचे आईवडील आसारामचे अनुयायी होते.
15 ऑगस्ट 2013 रोजी पीडित मुलगी शाळेत पडली, तेव्हा तिच्यावर उपचार करण्यासाठी तिचे आईवडील तिला आसारामच्या आश्रमात घेऊन गेले. पोलिसांच्या मते तेव्हाच आसारामनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर आसाराम बापूला इंदूरमध्ये अटक करण्यात आली. अटकेनंतर समर्थकांनी गोंधळ घातला आणि निदर्शनं केली.
अटकेनंतर त्याची पौरुषत्व चाचणी घेण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आणि मग 2 सप्टेंबर 2013ला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. आसाराम यांच्याकडून आतापर्यंत 12 वेळा जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यातला एकही अर्ज कोर्टाने स्वीकारला नाही. 2014 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा अनेक साक्षीदारांवर आसाराम समर्थकांनी हल्ला केला होता.
कोण आहे आसाराम बापू ?
एप्रिल 1941मध्ये पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या बेरानी गावात जन्माला आलेल्या आसाराम याचं खरं नाव असुमल हरपलानी आहे. सिंध प्रांतातल्या व्यापारी समुदायाशी संबंधित असलेल्या आसारामचं कुटुंब 1947च्या फाळणीनंतर अहमदाबाद शहरात येऊन स्थायिक झालं.
60च्या दशकांत त्याने लीला शाह यांना आपलं अध्यात्मिक गुरू मानलं. त्यानंतर लीला शाह यांनी असुमल याचं नाव आसाराम असं ठेवलं. 1972 मध्ये आसाराम यांनी अहमदाबादपासून जवळपास 10 किलोमीटर दूर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या मुटेरामध्ये त्यांचा पहिला आश्रम सुरू केला. इथून सुरू झालेला आसारामचा अध्यात्मिक प्रकल्प हळूहळू गुजरातमधल्या शहरांमार्गे देशातल्या इतर राज्यांमध्ये पोहोचला.
सुरुवातीला गुजरातच्या ग्रामीण भागातले गरीब, मागास आणि आदिवासी वर्गातले आसाराम बापूचे भक्त बनले. प्रवचन, देशी औषधं आणि भजन-किर्तन या त्रिसूत्रीच्या जोरावर आसाराम यांचा प्रभाव हळूहळू शहरी मध्यमवर्गांमध्ये वाढू लागला.
सुरुवातीच्या वर्षांत प्रवचनानंतर प्रसादाच्या नावाखाली मिळणाऱ्या मोफत जेवणामुळे आसाराम यांच्या 'भक्तांच्या' संख्येत वेगानं वाढ झाली. नंतरच्या काही वर्षांत आसारामनी आपला मुलगा नारायण साई यांच्यासह देश-विदेशात 400 आश्रमांचं जाळं उभारलं. भक्तांची संख्या वाढल्यानंतर राजकीय नेत्यांनीही आसाराम यांच्या माध्यमातून एका मोठ्या मतदार समूहावर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला.
1990 पासून 2000च्या दशकापर्यंत त्यांच्या भक्तांच्या यादीत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी यांसारखे दिग्गज नेते सामिल झाले होते. यांच्याबरोबरीनं दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि मोतीलाल व्होरा यांसारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा भक्तांच्या यादीत होते.
तसंच, भाजपचे विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री सुद्धा आसाराम यांचं दर्शन घेण्यासाठी वारंवार जात राहिले आहेत. यात शिवराजसिंह चौहान, उमा भारती, रमण सिंह, प्रेमकुमार धूमल आणि वसुंधराराजे यांचा समावेश आहे. या सगळ्या नेत्यांपेक्षा 2000मध्ये आसाराम यांचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या यादीत महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं.
मात्र, 2008 मध्ये आसाराम यांच्या मुटेरा इथल्या आश्रमात दोन लहान मुलांच्या हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली.