महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
प्रभाकर मोरे यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, शेजारी-शेजारी यांसारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. पक्षप्रवेश होताच अजित पवार यांनी प्रभाकर मोरे यांच्यावर कोकण विभागाचे अध्यक्षपद आणि चित्रपट सांस्कृतीक विभागाची जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर प्रभाकर मोरे म्हणाले की, कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रवेश केला. अजित पवार, सुप्रिया सुळे हे नेहमी अडचणीच्या वेळी कलकारांच्या पाठीशी उभे राहतात. सर्वसामान्य कलाकारांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.
प्रभाकर मोरे हे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहचले आहेत. या कार्यक्रमात प्रभाकर मोरेंना ‘कोकणचा पारसमणी’ म्हणून ओळखले जाते.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेम 'रमी'वर बंदी घालण्याची मागणी होत आहे. ऑनलाईन रमीच्या माध्यमातून अधिकृपणे जुगार खेळला जात आहे, असं राष्ट्रवादीनं म्हटलं होतं. यावर बोलताना मोरे म्हणाले की, मी रमीची जाहिरात करणार नाही, तसंच इतर कलाकारांनीही अशा जाहिराती करू नये , असं प्रभाकर मोरे या कार्यक्रमात आवाहन केले.