100 कोटींचे घर आणि 12 आलिशान गाड्या .. हृतिक रोशनची कमाई पाहून बसेल धक्का !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
जगातील सर्वात आकर्षक पुरुषाची पदवी एका भारतीय अभिनेत्याच्या नावावर आहे. नृत्य, ऍक्शन आणि अभिनयाचा बादशाह बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनला ही पदवी देण्यात आली आहे. आज हृतिक रोशनचा वाढदिवस आहे. हृतिक रोशनचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी झाला. जरी हृतिकचे वडील स्वतः एक अभिनेते, निर्माते आहेत आणि त्यांनी वडिलांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी आज हृतिक त्याच्या स्टाईल, अभिनय आणि लूकसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे आपल्या प्रवासाची सुरुवात करणारा, ऋतिक हा 'सुपर 30' आणि 'वॉर' सारख्या हिट चित्रपटांसह इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता आहे. एका चित्रपटासाठी तो सर्वाधिक मानधन घेतो. हृतिक 100 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहतो. त्याचबरोबर त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती, उत्तम कार कलेक्शन आहे. हृतिक रोशनची एकूण संपत्ती आणि लक्झरी जीवनशैलीबद्दल जाणून घेऊया.
० हृतिक रोशनची एकूण संपत्ती
आज मोठ्या पडद्यावर दिसणारा हृतिक एकेकाळी कॅमेऱ्याच्या मागे काम करायचा. हृतिक त्याच्या वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करायचा. पुढे तो अभिनयात आला. त्यानंतर यश त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागले. या यशाचे रूपांतर त्यांनी करोडो रुपयांमध्ये केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक एकूण 370 मिलियन डॉलर्सच्या संपत्तीचा मालक आहे. भारतीय पैशात त्याची किंमत सुमारे 2700 कोटी आहे. ज्यामध्ये 1200 कोटींची गुंतवणूक, 100 कोटींहून अधिकचे बंगले आणि अपार्टमेंट, कोट्यवधींची वाहने आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे.
० हृतिक रोशनची कमाई
हृतिक रोशन एका चित्रपटासाठी 35 कोटी रुपये घेतो. याशिवाय हृतिक एका प्रोडक्टच्या प्रमोशनसाठी 8 ते 15 कोटी रुपये घेतो. हृतिक अनेक मोठ्या ब्रँड आणि कंपन्यांच्या प्रसिद्ध उत्पादनांच्या जाहिरातीशी संबंधित आहे. हृतिकच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे अभिनय आणि चित्रपट. याशिवाय हृतिक ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. याशिवाय हृतिक एक बिझनेसमन देखील आहे. दिल्लीत त्यांची बर्गर चेन आहे, ज्यामध्ये अनेक रेस्टॉरंट आहेत. हृतिकचीही स्वतःची क्लोदिंग लाइन आहे. हृतिकच्या वार्षिक कमाईबद्दल बोलायचे झाले तर तो वर्षाला 180 कोटी रुपये कमावतो.
० हृतिक रोशनचे आलिशान घर
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 100 कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान बंगल्याची अनेकदा चर्चा होते, मात्र बॉलिवूडचा सर्वात स्टायलिश अभिनेता हृतिक रोशनकडेही 100 कोटींहून अधिक किमतीचे आलिशान घर आहे. मुंबईत असलेल्या सुंदर लक्झरी अपार्टमेंटमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. एका रिपोर्टनुसार, हृतिकच्या घरातून अरबी समुद्राचे दृश्य दिसते. एवढेच नाही तर हृतिकचे जुहू-वर्सोवा लिंक रोडवर दोन अपार्टमेंट आणि एक फ्लॅटही आहे, जो भाड्याने दिलेला आहे. सी फेसिंग बिल्डिंगमध्ये हृतिकचे 14वा, 15वा, 16वा फ्लॅट आहे. मुंबईशिवाय दिल्ली, बंगळुरूच्या पॉश भागातही हृतिकची प्रॉपर्टी आहे.
० हृतिक रोशनचे लक्झरी कार कलेक्शन
हृतिकला महागड्या वाहनांचा शौक आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 25 कोटींचे कार कलेक्शन आहे, ज्यामध्ये फेरारी, व्होल्वो, ऑडी, मर्सिडीज आणि पोर्श ब्रँडच्या 12 गाड्यांचा समावेश आहे. हृतिककडे स्वतःची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन देखील आहे, ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.