साठीच्या जवळपास पोहोचलेली 'ही' अभिनेत्री दिसते आजही तितकीच सुंदर आणि फिट !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

साठीच्या जवळपास पोहोचलेली 'ही' अभिनेत्री दिसते आजही तितकीच सुंदर आणि फिट !

मुंबई - 

80-90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने तर जिंकलीच पण आपल्या सौंदर्याने सर्वांना थक्क केले. आज त्यातील बहुतांश अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जोडल्या गेल्या आहेत. त्यात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीच्या नावाचाही समावेश आहे. मीनाक्षीने तिच्या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. ती सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडतात. मीनाक्षीने 16 नोव्हेंबरला तिचा 58 वा वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावर फोटोही शेअर केला. या फोटोमध्ये ती फुलं आणि फुग्यांमध्ये दिसत आहे. साठीच्या जवळ पोहोचलेल्या मीनाक्षीचा फिटनेस आणि तिचे सौंदर्य पाहून चाहते आश्चर्यचकित न झाले तरच नवल !

मीनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. एका गालावर हात ठेवून हसत तिने पोज दिली आहे. तिच्या या फोटोला हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. फॅन्स आणि स्टार्सनीही कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - 'तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा'. दुसर्‍या यूजरने लिहिले - 'हे खरोखर तुम्ही आहात का?'

हा फोटो शेअर करत मीनाक्षी शेषाद्रीने लिहिले - 'शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.' वयाची साठ जवळ आली आहे पण तिचा फिटनेस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या वयातही मीनाक्षीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

मीनाक्षीने बॉलिवूडमध्ये 'दामिनी', 'हीरो', 'घातक', 'घायल' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'दामिनी' या चित्रपटाने त्यांच्या करिअरला चार चाँद लावले होते. मीनाक्षीचा पहिला चित्रपट 'पेंटरबाबू' होता पण तिच्या कामाला 'हिरो' चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांचा हिरो होता जॅकी श्रॉफ. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि मीनाक्षी रातोरात स्टार बनली.

अभिनेत्रीने जवळजवळ प्रत्येक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकासोबत काम केले. अमिताभ बच्चन ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर असे बडे तारे तिचे हिरो होते. मीनाक्षीने अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मेयर यांच्याशी लग्न केले. एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आधी दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेम, त्यानंतर दोघांनी लग्न केले.