MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

मुंबई (प्रबोधन वृत्तसेवा) - एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तत्काळ लागू न करता तो २०२५ सालापासून लागू करावा अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. दरम्यान, विद्यार्थ्यांची हीच मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन परीक्षा नियमांविरोधात आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. हे नियम दोन वर्षांनी लागू करण्याची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही माहिती देताच पुण्यात आंदोलनकर्त्या MPSC विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरू केले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा, ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची होती. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला होता.

आंदोलनात गैरप्रकार टाळण्यासाठी आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार हे नेतेही सहभागी झाले. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात वेळोवेळी विद्यार्थांनी आंदोलन केले आहे. यापूर्वी देखील पुण्यातील शास्त्री मार्गावर अहिल्यादेवी शिक्षण मंडळ आणि अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, विद्यार्थ्यांची बाजू सरकारकडे लावून धरणे आमचे काम आहे. या विषयाचा निर्णय लागला पाहिजे हीच आमची इच्छा आहे.आम्ही काल देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे.कारण एमपीएससी विद्यार्थ्यांचा पुण्यातलं आंदोलन सरकारला परवडणार नाही. मुंबईमध्ये कॅबिनेट बैठक होणार असून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सरकारकडून लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले होते. त्यामुळे हे आंदोलन खरच अराजकीय आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आम्ही आंदोलनात घुसखोरी केली नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही जबाबदारी आहे. खरतर ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते. सगळ्या लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणे आम्ही आमचे काम समजतो. म्हणून सरकारमध्ये असून देखील घर कोंबडा न बनता आम्ही लोकांपर्यंत जात आहोत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.