पोटनिवडणुकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; शिवसेना नेत्यांची मध्यस्थी फळाला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पोटनिवडणुकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; शिवसेना नेत्यांची मध्यस्थी फळाला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल कलाटे पक्षाचा आदेश पाळणार ?

पुणे/पिंपरी (प्रबोधन न्यूज) - कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याकरिता अवघे दोन तास उरले आहेत. त्यामुळे पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडने माघार घेतली आहे. कसबा पेठ आणि चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडचे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर अखेर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

कसबापेठमधून संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते आणि चिंचवडमधून प्रवीण कदम उभे होते. या दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला होता. संभाजी ब्रिगेड हा ठाकरे गटाचा मित्र पक्ष असतानाही त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं होतं.

आज सकाळी अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी चर्चा केली. त्यानंतर सचिन अहिर यांनी या उमेदवारांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशीही चर्चा केली. या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून देण्यात आली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मतांची विभागणीही टळणार आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अर्ज भरला आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी निवडणुकीतून माघार घेणे महाविकास आघाडीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी चालू आहे. कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनीही कलाटे यांच्याशी चर्चा केली.

राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली. आता कलाटे अंतिम निर्णय घेणार आहे.

आज (10 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, घडामोडींना वेग आला आहे. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

कलाटेंच्या भेटीनंतर सचिन अहिर म्हणाले, "राहुल कलाटे हे आमच्यातीलच एक आहेत. त्यामुळे त्यांची समजूत घालावी म्हणून आणि त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य अंधारमय होऊ नये म्हणून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आग्रही मागणी केलीये. आता सर्व माहिती देणं उचित नाही."

सचिन अहिर पुढे म्हणाले की, "पक्षप्रमुखांचा (उद्धव ठाकरे) निरोप घेऊन मी आलो होतो. पक्षप्रमुखांनीही त्यांना सांगितलं की, तुम्ही तरुण आहात. यामध्ये काही झालं असलं, तरी महाविकास आघाडी नेता या नात्याने ते असतील किंवा त्यांच्यासोबतचे... भविष्यकाळात कशा प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून मदत करता येईल. त्याबद्दल चर्चा करू शकतो. ते करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला चांगलं राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही यातून माघार घ्यावी, असा निरोप त्यांना दिला आहे."

"पक्षप्रमुखांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. पक्षप्रमुखांनीही त्यांना सांगितलं की, 'शांत डोक्याने विचार करा आणि या गोष्टीबद्दल कळवा.' आता आम्हाला अपेक्षा आहे की, आमचा आग्रह ग्राह्य धरून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं काम ते करतील", असं अहिर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, सचिन अहिरांनी सांगितले की, "त्यांचं असं मत आहे की एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत त्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही आशावादी आहोत की ते चांगला निर्णय घेतील. ते महाविका आघाडीच्या उमेदवारासोबत राहतील. ते लवकरच त्यांची भूमिका जाहीर करतील", अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली.