परदेशी महिलेचा मुंबईला येणाऱ्या विमानात नंगानाच
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई (प्रबोधन वृत्तसेवा) - विमानातील प्रवाशांशी गैरवर्तनाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी इटलीच्या एका ४५ वर्षीय महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये तिने केबिन क्रूला मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर नंतर ती अर्धनग्न अवस्थेत विमानात फिरत होती. अलीकडच्या काळात विमान प्रवासादरम्यान सहप्रवाशांसोबत गैरवर्तन, क्रूसोबत वाद अशा अनेक घटना घडल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एअर विस्तारा फ्लाइट UK 256 च्या केबिन क्रूकडून मुंबईत उतरल्यानंतर पोलिसांना तक्रार मिळाली. पहाटे २.०३ वाजता अबुधाबीहून विमानाने उड्डाण केले होते. इकॉनॉमी क्लासचे तिकीट घेतलेली पाओला पेरुचियो ही महिला प्रवाशी बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे करण्यापासून रोखल्यानंतर तिने क्रूला मारहाण केली आणि कपडे उतरवून विमानात फिरू लागली.
सहार पोलिसांनी तिला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पहाटे 2.30 च्या सुमारास इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेली एक महिला अचानक उठली आणि बिझनेस क्लासच्या दिशेने धावू लागली आणि तेथील सीटवर ती बसली. केबिन क्रूचे दोन सदस्य तिच्याजवळ आले आणि मदत हवी आहे का, असे विचारले. जेव्हा प्रवाशाने प्रतिसाद दिला नाही तेव्हा तिला तिच्या जागेवर परत जाण्यास सांगितले. त्यानंतर ही महिला त्याच्यावर आरडाओरडा करू लागली.
जेव्हा क्रूने महिलेला गैरवर्तन करण्यापासून रोखले तेव्हा तीने एकाच्या तोंडावर हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्याच्या तोंडावर ती थुंकली. काही वेळातच इतर क्रू मेंबर त्यांच्या जोडीदाराला मदत करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्या महिलेने कपडे उतरवले व विमानाच्या मधल्या जागेतून ती इकडून तिकडे फिरू लागली.
अखेर पहाटे ४.५३ वाजता विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले तेव्हा महिलेला एअर विस्ताराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर तिला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महिलेला कोर्टात हजर करण्यात आले, तेथून तिला जामीन मिळाल्याचे वृत्त आहे.