सत्ता आल्यानंतर मोदी-शहांना तुरूंगात डांबू – प्रकाश आंबेडकर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सत्ता आल्यानंतर मोदी-शहांना तुरूंगात डांबू – प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी दारूड्याप्रमाणे वागतात आंबेडकरांचा दावा

पुणे (प्रबोधन वृत्तसेवा) - २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असा दावा वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते पुण्यातील खडकवासला येथील सभेत बोलत होते.

माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी अनेकवेळा विचारलं ते सोनं परत आणलं का? पण त्यावर कुणी उत्तर देत नाही. यावरुन देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरुन आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारूडा अशावेळी घरातली भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमके तेच करतायत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मात्र अशी टीका करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे नरसिंहराव यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

नेहरूंनी देशात कारखाने उभे केले. तेच कारखाने आज भारताचा आर्थिक कणा आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागला आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

घर चालवायला आपल्याला हजार रुपये लागत असतील आणि आपली कमाई ८०० रुपये असेल तर वरचे २०० रुपये कर्ज काढावे लागतात. त्याप्रमाणेच आज नरेंद्र मोदी कर्ज काढून देश चालवत आहेत. या कर्जासाठी कारखाने विकण्याचा सपाटा त्यांनी सुरु केला आहे. मला आणि पंतप्रधान मोदींना एकाच व्यासपीठावर बसवा. मी त्यांना चार प्रश्न विचारतो, त्यांनी त्याची उत्तरे देऊन दाखवावीत किंवा मोहन भागवत यांनी तरी समोर यावे. आर्थिक दृष्टीकोनातून या देशाचे वाटोळं करण्याचं काम सुरु आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी देश सोडून निघून गेले याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, ज्या वाझेने बॉम्ब ठेवला त्याच वाझेला आता माफीचा साक्षीदार केले जाणार आहे. आपल्याला चाकू मारणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच आरोपीला माफीचा साक्षीदार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल का? हेच अंबानीला लक्षात आले आहे. मोदींच्या व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे ते देशच सोडून गेले. आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसोबत कायद्याची ही अवस्था आहे.