पंतप्रधान मोदी बोलताना एक शब्द चुकले, म्हणाले, ‘बेटी बचाव, बेटी पटाव…’;   व्हिडीओ व्हायरल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंतप्रधान मोदी बोलताना एक शब्द चुकले, म्हणाले, ‘बेटी बचाव, बेटी पटाव…’;   व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली -

ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्यानं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका त्यांच्यावर होत आहे.

या कार्यक्रमात मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेचा संदर्भ देत बोलत होते. मात्र, बोलताना ते 'पढाओ' शब्द चुकीचा बोलले त्यामुळे घोषणेचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पंतप्रधान मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ या योजनेच्या यशाबद्दल सांगत होते. यावेळी बोलताना ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ असं म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, व्हायरल व्हिडीओवरून नेटकरी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. ‘आज पुन्हा टेलीप्रॉम्टर बंद पडला का,’ असा प्रश्न विचारत त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. मोदीजी बोलता बोलता त्यांच्या ‘मन की बात’ बोलून गेले, असं म्हणत एका युजरने त्यांना ट्रोल केलंय.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी देखील मोदींचा हा व्हिडीओ ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. ‘टेलीप्रॉम्टरवर वाचूनही हे काय बोलून गेले मोदीजी, थोडी तरी लाज ठेवा,’ असं कॅप्शन टाकत त्यांनी पोस्ट टाकली आहे.