जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल
जोधपूरमध्ये १२ तासांत तीन वेळा दंगल

१० ठिकाणी संचारबंदी लागू

आमदाराच्या घराबाहेर जाळपोळ

अनंतनागमध्ये सुरक्षा रक्षकांवर दगडफेक

जोधपूर (राजस्थान), दि. ३ मे - राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदनिमित्त झालेल्या प्रचंड गदारोळानंतर तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाने बुधवारपर्यंत जोधपूरच्या 10 भागात संचारबंदी लागू केली आहे. इकडे सूरसागर भागात आमदारांच्या घराबाहेर लोकांनी आग लावली. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेचा अहवाल मागवला आहे.

जोधपूरच्या अनेक भागात दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दगडफेकीत आज आणखी एक पोलीस जखमी झाला, तर काल रात्री ४ पोलीस जखमी झाले. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील १० भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उदय मंदिर, नागोरी गेट, सदर कोतवाली, सदर बाजार, सूरसागर, सरदारपुरा, खांदाफळसा, प्रताप नगर, देवनगर, प्रतापनगर सदर या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यापूर्वी सोमवारी रात्री झेंडे आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली होती. मंगळवारी सकाळी जालोरी गेट परिसरात एका समाजाचे लोक जमा होऊन पुन्हा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

जोधपूरमध्ये सोमवारी रात्री हल्लेखोरांनी २० हून अधिक वाहनांच्या काचा फोडल्या आणि अनेक एटीएमचीही तोडफोड केली. जोधपूरचे पोलिस आयुक्त नवज्योती गोगोई यांनी सांगितले की, परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. रात्री उशिरापासून जालोरी गेट आणि इदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच वेळी, इंटरनेट बंद केले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोन्ही पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी रात्री जोधपूरमधील जालोरी गेट चौकात जोरदार दगडफेक झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला, एका समुदायाने पोलिसांवरही दगडफेक केली, ज्यात 4 पोलिस जखमी झाले.

दंगलीनंतर २२ दिवसांनी संचारबंदी असताना मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये सण साजरे केले जात आहेत. आज कर्फ्यू शिथिल केला जाणार नाही, असा निर्णय पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. ईदची नमाज घरीच पार पडली. अक्षय्य तृतीयेला शहरात कुठेही सार्वजनिक विवाह होणार नाही. तसेच परशुराम जयंतीची मिरवणूकही निघणार नाही.

शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तालाब चौक, पहारसिंगपुरा, काजीपुरा, मोहन टॉकीज, गुरुव मोहल्ला, भावसार मोहल्ला आदी ठिकाणी जास्तीत जास्त देखरेख करण्यात येत आहे. प्रभारी एसपी रोहित काशवानी यांनी सांगितले की, शहरात 1300 जवान तैनात आहेत. ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासह सर्व आपत्कालीन सेवा देखील सतर्क आहेत. दुसरीकडे, पोलिस मुख्यालयाने निमार, माळवा आणि महाकौशल या संवेदनशील जिल्ह्यांना अलर्ट पाठवला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी दगडफेकीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे ईदच्या नमाजनंतर एका मशिदीबाहेर दगडफेक झाली. आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.