“आपले सरकार” या तक्रार निवारण प्रणालीला नागरिकांचा प्रतिसाद नाही
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारीचे ऑन लाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करून घेता यावे, यासाठी आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. याबाबतची कार्यपद्धती संदर्भाधीन शासन निर्णयांन्वये विशद करण्यात आलेली आहे.
तथापि अद्यापही तक्रारी या ‘आपले सरकार’ तक्रार प्रणालीवर नागरिकांकडून करण्यात येत नाहीत. सबब आता शासनाकडे तसेच शासनाच्या अधिनस्त कार्यालयांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी या ‘आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली’मार्फतच स्वीकारण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मंत्रालयातील विभागाकडे तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालयाकडे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी संदर्भात खालील कार्यवाही करण्यात यावी असे शासनाकडून त्या त्या विभागाकडे परिपत्रक पाठविण्यात आले आहे.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी या आपले सरकार तक्रार प्रणालीमार्फत ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारण्यात याव्यात.
तथापि, मंत्रालयीन विभागाकडे / शासकीय प्राधिकारणाकडे / अधिनस्त कार्यालयांकडे यापूर्वी तसेच यानंतर ऑफलाईन स्वरुपात प्राप्त झालेल्या/ होणा-या तक्रारींचा समावेश आपले सरकार तक्रार प्रणालीमध्ये ऑनलाईन (Online) स्वरुपात सदर तक्रारीची पोच देणा-या कार्यालयाने करावा आणि सदर तक्रार निवारणासाठी संबंधितांकडे ऑनलाईन(Online) स्वरुपात पाठवावी, जेणेकरुन नागरिकांना/ तक्रारदांराना सदर तक्रारीचा ऑनलाईन पाठपुरावा करता येईल. कोणत्याही कार्यालयात पोस्टाने अथवा पत्र स्वरूपात प्राप्त होणा-या तक्रारी संबंधित कार्यालयाने “आपले सरकार” तक्रार प्रणालीमध्ये ऑनलाईन (Online) समाविष्ट कराव्यात व त्या पुढील कार्यवाहीस्तव ऑनलाईन (Online) स्वरुपात संबंधिताकडे पाठवाव्यात, जेणेकरुन नागरिकांना/तक्रारदाराना सदर तक्रारीचा ऑनलाईन पाठपुरावा करता येईल. समक्ष लेखी तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराचा मोबाईल नंबर तक्रार अर्जावर नमूद करण्याची विनंती करण्यात यावी जेणेकरून तक्रार प्राप्त झाल्याबाबतचा लघु संदेश त्याला पाठविता येईल.
ज्या मंत्रालयीन विभागाने / प्राधिकारणाने / अधिनस्त कार्यालयाने स्वत:ची तक्रार निवारण कार्यप्रणाली विकसित केली असेल त्यांनी सदर कार्यप्रणालीशी आपले सरकार तक्रार निवारण कार्यप्रणालीशी सांगड (Link) घालावी.
मंत्रालयीन विभागाने/प्राधिकारणाने/अधिनस्त कार्यालयाने त्यांच्याकडे आपले सरकार तक्रार प्रणालीवर दिनांक १ डिसेंबर, २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावा.
या सूचनाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांनी घ्यावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०१३०१२५६३५०९०७ असा आहे.