अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित

चार दिवसांपासून भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित

मुंबई - राज्य सरकारने आमच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत, अशी घोषणा जीवा पांडू गावित यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगतानाच गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

शेतकरी नेते, माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी मीडियाशी संवाद साधला. काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निवेदन आम्हाला दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतलं. त्यानुसार आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी सांगितलं.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं निवेदन हे समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेतही निवेदन दिलं आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गावागावात दाखवला पाहिजे असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. मोर्चेकरी समाधानी आहे. काही उरलेल्या मागण्या लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.

आज सकाळपासून आंदोलन स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र बैठकीच्या झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत जेपी गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावित म्हणाले की, "आम्ही सतरा मागण्या केल्या होत्या, यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत."

शेतकऱ्यांना घरी पोहोचवण्यासाठी सरकारतर्फे रेल्वेचे आरक्षण

दरम्यान सरकारतर्फे शेतकऱ्यांना घरी पोहोचवण्यासाठी एक ट्रेन देखील बुक करण्यात आली आहे. अखेर पाच दिवस आपल्या मागण्यांसाठी हे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. दोन दिवस वाशिंदमध्ये मुक्कामांनंतर आज ते घरी परतणार आहेत.

आंदोलना दरम्यान अनेक अडचणींशी सामना

या आंदोलनात अनेक घटना घडल्या. एकाचा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहे. एक महिला वाशिंदमध्ये पाऊस आल्याने डकमध्ये पडली. तिच्यावर पोलीस हवालदार नाईक यांनी उपचार केले. तर एका महिलेला नाशिकमध्ये डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला होता. तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर ती परत आंदोलनात आली. एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याने त्याला दवाखान्यात नेले. त्याला अटॅक आला होता. डॉक्टरांनी त्याला सांगितलं तुला सौम्य हृदयविकाराचा झटका आला. आंदोलनात जाऊ नको. तरीही तो आला. संध्याकाळी पुन्हा त्याला अस्वस्थ वाटू लागले व त्याचं निधन झालं. जनतेसाठी त्यांनी प्राण दिले, असंही त्यांनी सांगितलं.