धीरेंद्र शास्त्रींना दिसेल तिथे ठोका – अमोल मिटकरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
धीरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवार संतापले
मुंबई - ‘संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’ असं विधान शास्त्रींनीं केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शास्त्री जिथं दिसतील तिथं त्यांना ठोका अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
दर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही आक्रमक भूमिका घेत धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, “बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत… या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही.” असं रोहित पवार म्हणाले.
मिटकरी यांनी तुकोबांच्याच काही अभंगांचे दाखले देत धीरेंद्र शास्त्रींवर शरसंधान साधले आहे. बागेश्वर महाराजांना वारकरी संप्रदाय म्हणजे काय ? हे माहिती नाही त्यांनी केलेलं विधान चुकीचे आहे त्यामुळे धीरेंद्र शास्त्री जिथं दिसतील तिथं वारकरी संप्रदायाने त्यांना ठोका असा इशाराच मिटकरांनी यावेळी दिला आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नेमकं काय म्हणाले ?
“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? यावर तुकोबा म्हणाले की, ‘देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी मिळाली. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले असते तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’. असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.