चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप भाजपचे उमेदवार ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (प्रबोधन न्यूज) – भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आकस्मिक निधनामुळे चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु आज कै. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला, त्यामुळे त्याच भाजपच्या अधिकृत उमेदवार असाव्यात अशी चर्चा राजकीय व माध्यमांमध्ये पसरली आहे.
दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनीही उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. मात्र राष्ट्रवादीने तसेच मविआनेही अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र की स्वतंत्र लढणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेनेही या मतदारसंघावर आपला हक्क सांगितला आहे. मनसेही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.
नाना काटे यांनी 2014 मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पोटनिवडणूक लढविण्यासाठी काटे तीव्र इच्छुक आहेत. आता पक्ष कोणाला उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत बोलताना नाना काटे म्हणाले की, मी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अजितदादांसोबत आज बैठक आहे. पक्षाकडून आदेश आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा पूर्व तयारी म्हणून अर्ज घेतला आहे. अजितदादा जे निर्देश देतील. त्यानुसार आम्ही पुढचे पाऊल उचलू. चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व योग्य निर्णय होईल.