उद्धव ठाकरे-शिंदेंच्या वादाला जनता कंटाळलीय – राज ठाकरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्धव ठाकरे-शिंदेंच्या वादाला जनता कंटाळलीय – राज ठाकरे

शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे – राज ठाकरे

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाहीत, असे भाष्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. ते मंगळवारी रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपले बंधू तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. मी तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही, असे म्हणत आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे. मात्र त्यांनी केलेल्या विधानावरून हा टोला अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लागवण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सध्याच्या घडामोडींमुळे शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते. या मेळाव्यात ‘एकला चलो रे’ चा नारा देत राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करा, असा आदेशही मनसैनिकांना दिला आहे.

याअगोदर ज्या काही बातम्या आल्या त्यामध्ये काहीच तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत. राज्यात सध्या घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून लोकं आपला विचार करतील. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा,सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवा ,असे आवाहनही राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

यावेळी राज ठाकरे यांनी ‘सहा एम’चा फार्म्युला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेक्यॉनिझ या सहा एम सांगून त्यावर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी मनसैनिकांना केल्या.

मेक्यॅनिझ म्हणजे टेक्नॉलीजीचा वापर करा, मेसेज म्हणजे पक्षाचे विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीसाठी पैसा लागतोच, तो कुठून तरी उभा करून आपण निवडणुका लढवू, असेही राज ठाकरे म्हणाले.