RSS वरील बंदीची सार्वत्रिक चर्चा व्हायला हवी – सुप्रिया सुळे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

RSS वरील बंदीची सार्वत्रिक चर्चा व्हायला हवी – सुप्रिया सुळे

सोलापूर, (प्रबोधन वृत्तसेवा) - पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली आहे. सोलापूर येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या, त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी करत असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी असे म्हटले आहे.

 “केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच पीएफआयवरील बंदी संदर्भात संसदेतदेखील केंद्र सरकारला स्पष्टीकरण विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधीपक्षांवर होणाऱ्या कारवाईवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत ९० छापे हे विरोधीपक्षाच्या नेत्यांवर झाले आहेत. भाजपा लॉंड्रीत आल्यानंतर अनेकांची सुटका होते, असे भाजपाचेच नेते म्हणतात. मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. जे घडतय ते अत्यंत दुर्दैवी आहे”, असेही त्या म्हणाल्या आहेत.