पोलीस महिलेला जखमी केल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पोलीस महिलेला जखमी केल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, दि. 5 मे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात होते. मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ येथे पोहोचले. त्यानंतर घरातून बाहेर निघाल्यानंतर देशपांडे आणि धुरी यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र दोघेही पोलिसांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाले. या झटापटीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागून ती खाली पडली. यामध्ये संबंधित महिला कर्मचारी जखमी झाली. त्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता मनसे नेत्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

देशपांडे यांनीही एक व्हिडिओ प्रसिद्ध करत घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, मी सकाळी राज ठाकरेंना भेटायला गेलो होतो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाईट मागितला. त्यांच्याशी बोलत असताना दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासार तिथे आले. त्यांनी मला बाजूला नेहण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला ताब्यात घेत आहात का? असा प्रश्न मी त्यांना विचारला. गर्दी होत असल्याने बाजूला घेत आहे ताब्यात घेत नाही असं त्यांनी सांगितलं. पोलीस निरीक्षक कासार यांनी माध्यमांशी बोलत असताना मला थोड्या अंतरावर घेऊन गेले. सकाळ पासून मी कोणतही आंदोलन केलं नाही. मग मला कशाला ताब्यात घेत आहे असा प्रश्न विचारला.

आतापर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच केलं आहे. अनेकदा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झालो आहे. पोलिसांचा आम्ही सन्मान करतो. मी धक्काबुक्की केली, महिला पोलिसाला जखमी केलं हे कासार साहेबांनी हृदयावर हात ठेवून सांगावं. मी खोटे बोलत असेन पण सीसीटीव्ही खोटे बोलणार नाहीत. माध्यमांचे कॅमेरे खोटे बोलणार नाहीत असंही देशपांडे म्हणाले. आम्ही अटकेला घाबरत नसून मी कोठेही पळून गेलो नाही. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.