जटिल शस्त्रक्रिया करताना लाईव्ह कार्यशाळेच्या मार्गदर्शनाचा उपयोग : डॉ. विजय काकतकर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटनेची लाईव्ह सर्जरी कार्यशाळा संपन्न
पिंपरी - नवोदित अस्थिरोगतज्ञांना अत्यंत जटिल अस्थिभंगावर (फ्रॅक्चर) शस्त्रक्रिया करताना लाईव्ह कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल. यामुळे चांगल्या प्रकारचे बारकावे समजून घेता येतील आणि पूर्ण उपचाराअंती फलनिष्पत्ती निश्चितच चांगली असेल असे मार्गदर्शन ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॅा. विजय काकतकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटना ( Pimpri Chinchwad Orthopaedic Association) आणि पिंपरी येथील डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय “लाईव्ह सर्जरी कार्यशाळा” चे (शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण) आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ११० पेक्षा जास्त अस्थिरोगतज्ञ सहभागी झाले होते. त्यांना गुंतागुंतीच्या ६ शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा व त्या शस्त्रक्रियांमधील बारकावे अभ्यासण्याची संधी मिळाली.
यावेळी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. विजय काकतकर (नाशिक), डॉ. प्रदिप कोठाडिया (सोलापूर), फुट व ॲंकल तज्ञ डॅा. संपत डुंबरे पाटील (पुणे), डॉ. शाम शिंदे (पिंपरी चिंचवड), डॅा. एस. प्रशांथ (पिंपरी चिंचवड) यांनी स्वतः शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले.
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवळकर, महाविद्यालयाच्या शैक्षणिक संचालिका डॉ. पी. वत्सला स्वामी, पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटनेचे
माजी अध्यक्ष रत्नपारखी, विद्यमान अध्यक्ष डॉ. निर्मल ढुमणे, सचिव डॉ. अभिजीत महादार, पुणे अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ. स्वप्नील भिसे तसेच कार्यशाळेचे आयोजक सचिव डॉ. संजय साळवे, डॉ. राहुल साळुंखे व डॅा. हेमंत पाटील आदी उपस्थित होते. अस्थिभंगावरील शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपणाची कार्यशाळा पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. निर्मल ढुमणे म्हणाले की, या वर्षीची संघटनेची संकल्पना “इम्प्रूव्ह युवर स्कील” ही आहे. सर्व सभासद व नवोदित तज्ञांसाठी अशाप्रकारच्या विविध कार्यशाळा आयोजित करून त्यांचे कौशल्य अद्ययावत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
दरम्यान या कार्यशाळेत लोकमान्य रुग्णालयाचे (निगडी) डॉ. आशिष सुर्यवंशी यांनी “कृत्रिम सांध्याभोवतालचे अस्थिभंग” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. राजीव निरवणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. संजय साळवे यांनी आभार मानले.