भाजपा नेते मोहित कंबोजांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपा नेते मोहित कंबोजांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

मुंबई, दि. 1 जून - कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. मोहित यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा त्यांनी योग्य वापर केला नाही. त्यामुळे मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कंबोज यांनी हा आरोप फेटाळला आहे.

2011 ते 2015 या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण कंबोज यांनी कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

कंबोज यांनी हे 52 कोटी रुपये कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत मोहित कंबोज यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली असून, त्यांच्याविरोधातले आरोप फेटाळले आहेत. “मला कळाले मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असे करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसे होणार नाही. हे नवाब मलिकांचे काम असेल किंवा संजय राऊतांचे काम असेल तर मी याच्याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही”, असे कंबोज यांनी म्हटले.