एलआयसी विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एलआयसी विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
एलआयसी विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

पुणे, (प्रबोधन न्यूज) – संपूर्ण देशभर एलआयसीच्या विमा प्रतिनिधींनी आज आंदोलन केले. विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. पुण्यातही स्वारगेट येथील एलआयसी शाखेसमोर विमाप्रतिनिधींनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन केले.

विमाधारकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तसेच विमा प्रतिनिधींच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज देशभर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात 13 लाखांपेक्षा अधिक विमा प्रतिनिधी कार्यरत असून, देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम हे प्रतिनिधी करीत असतात. विमा पॉलिसीवरील जीएसटी रद्द करावी, पॉलिसी बोनसमध्ये वाढ करावी, कर्जावरील व्याजदर कमी करावा, विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम सुविधा मिळावी, एजंट्सना पेन्शनची सुविधा सुरू करावी, ग्रॅज्युएटीमध्ये वाढ करावी, आयआरडीच्यचा जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांचा यात समावेश आहे.

या आंदोलनात मागण्यांच्या घोषणा देऊन व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले. नंतर शाखाधिकारी ब्रह्मदेव कापसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्याची एक प्रत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना देखील देण्यात आली.

हे आंदोलन शाखाध्यक्ष भरत पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनाला पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष सुधीर पाध्ये, प्रमोद छाजेड, जे. टी. शहा, प्रकाश फुटाणे, निळकंठ ताकमोगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच विभागीय सचिव रमेश कांबळे, महेश गायकवाड, संजय नवघणे, योगेश शिंगाडे, बाळासाहेब इंदलकर, सदाशिव जिंदे यांच्यासह महिलाध्यक्षा वैशाली महाडिक, राधिका साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने विमा प्रतिनिधी उपस्थित होते.