मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या वादाचे वृत्त सरनाईकांनी फेटाळले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या वादाचे वृत्त सरनाईकांनी फेटाळले

मुंबई, (प्रबोधन न्यूज) – काही माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त दिले होते. त्याचे सरनाईक यांनी खंडन केले आहे. ही अफवा असल्याचे ते म्हणाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री आणि मी एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहोत असेही ते म्हणाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सरनाईक यांनी ते निवडून येत असलेला ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी शिंदे यांनी दबाव टाकायला सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याच्या चर्चा होत्या. त्यासाठी शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. सरनाईकांना ही गोष्ट कळताच त्यांनी थेट शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली, अशा प्रकारच्या चर्चा होत्या.

दरम्यान, या सर्व चर्चांचे प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी खंडन केले आहे. सरनाईक म्हणाले की, या सर्व चर्चा आणि बातम्या तथ्यहीन आहेत. कुठलीही शहानिशा न करता अशा बातम्या दिल्या जातात. थोड्याच वेळात मी आणि मुख्यमंत्री एकाच कार्यक्रमात आहोत. तर पूर्वेश सरनाईक यांनी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा एक फोटो ट्विट करुन त्याला दो दिल और एक जान है हम असे कॅप्शन दिले आहे.