भाजपने पंकजा मुंडे यांना डावलले; आता काय निर्णय घेणार पंकजा मुंडे ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली असून, भाजपने पाच जणांना उमेदवारी दिली आहे. यात पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. उद्या म्हणजेच ९ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, भाजपने आज पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात पंकजा मुंडे यांच्याबरोबरच चित्रा वाघ यांना वगळण्यात आलं आहे. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावांची चर्चा होण्यापेक्षा पंकजा मुंडे यांना वगळण्यात आल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती.
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातील नेतृत्वाकडून डावललं जात असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असतानाच भाजपकडून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर त्या संधीचे सोने करीन, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. त्यामुळे त्या विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची भाजपच्या गोटात जोरदार चर्चा होती. ‘ जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ‘ अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून काही वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती. पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याने पंकजा आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. त्या वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच मोठा जनाधार असलेल्या आणि ओबीसी समाजातील नेत्या आहेत. मात्र, त्यांचा पत्ता कट करून भाजपने उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.
आता तर त्यांना दिल्लीतून भाजपश्रेष्ठींचा खास निरोप आला आहे. आधी पंकजा मुंडेंनी परळी विधानसभा जिंकावी, असा निरोप पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना डिवचवलंय असं बोललं जातंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यायला लागू नये आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना डोईजड होऊ नयेत, यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली आहे. तसेच विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत त्यांचा परळी विधानसभेतून उमेदवारीसाठी दावा असल्याने विधानपरिषदेसाठी त्यांचे तिकीट कापले गेले, असं समजतंय.